बरेचदा लोक लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेन किंवा विमानाने प्रवास करतात. आरामदायी प्रवासासाठी एक आसन देखील उपलब्ध असते, ज्याचा प्रवासी प्रवासादरम्यान वापरतात. कल्पना करा, जर तुम्ही विमान प्रवास करत आहात आणि तुमच्या खुर्चीवर बसण्यासाठी आवश्यक उशी गायब असेल तर? अर्थात असा प्रवास करणे त्रासदायक ठरू शकते आणि ज्या आरामदायी प्रवासाच्या अनुभवासाठी इतके महागडे तिकिट विकत घेतो त्याची पैसे वाया गेल्यासारखे वाटू शकते. वास्तविक, नुकतेच इंडिगोच्या फ्लाइटमध्ये असेच काहीसे घडले. पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या सीटवरून कुशन गायब झाल्यामुळे तिला अडचणींचा सामना करावा लागला.

इंडिगो फ्लाइटमधील सीटची उशी झाली गायब

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
emboldened rioters attacked police officer in nashik
पोलीस अधिकारीच असुरक्षित, उपनिरीक्षकावरील हल्ला प्रकरणी तीन जण ताब्यात
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला

सागरिका असे या महिलेचे नाव असून तिने गेल्या रविवारी पुणे ते नागपूर या इंडिगो फ्लाइटने (६इ-६७९८) प्रवास करण्यासाठी तिकीट काढले होते. सागरिकाला एअरलाइनने खिडकीच्या बाजूची सीट क्रमांक १०ए दिला होता, पण जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या सीटवरची बसण्यासाठी आवश्यक उशी गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. अशा स्थितीत महिलेने केबिन क्रूकडे तक्रार केल्यावर त्यांनी तिला सीटखाली उशी शोधण्यास सांगितले. मात्र, महिलेने बराच शोध घेतल्यानंतरही तिला सीटची उशी सापडली नाही. यानंतर पुन्हा एकदा केबिन क्रूला याबाबत विचारणा करण्यात आली.

Optical Illusion : वाघ की, माकड! तुम्हाला या फोटोत सर्वप्रथम काय दिसले? उत्तरावरून ठरेल तुम्ही Practical आहात की, Creative?

महिला प्रवाशाला तुटलेल्या खुर्चीवर बसून करावा लागला प्रवास

या संपूर्ण प्रकरणावर महिला प्रवासी सागरिकाचा पती सुब्रता यांनी एअरलाइनवर प्रश्न उपस्थित केला आणि इंडिगोसारख्या एअरलाइन ब्रँडकडून अशी अपेक्षा नव्हती,असे म्हटले. सुब्रत म्हणाले, ‘जेव्हा विमान उड्डाणासाठी तयार होते, तेव्हा एक साफसफाईची टीम बोर्डिंग करण्यापूर्वी कसून तपासणी करण्यासाठी येते. उशी हरवलेली आगे हे त्यांच्या लक्षात नाही आले का? विमानात प्रथम प्रवेश करणाऱ्या केबिन क्रूनेही हे का पाहिले नाही.

इंडिगो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर उत्तर देत सांगितले की ‘हॅलो, हे निश्चितपणे चांगले घडले नाही. कधीकधी, सीट कुशन त्याच्या वेल्क्रोपासून वेगळे होते. आमच्या क्रूच्या मदतीने ते पुन्हा बसवले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, तुमची प्रतिक्रिया संबंधित विभागाच्या लोकांपर्यंत पोहचवली आहे.

हेही वाचा – धनुषच्या ‘Rowdy Baby’ गाण्यावर तरुणीने केला भन्नाट डान्स! व्हिडीओ पाहून साई पल्लवीची येईल आठवण!

पूजा हेगडे आणि राणा डग्गुबती या सेलिब्रिटींनी त्यांचे वाईट अनुभव आणि कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तनावर प्रकाश टाकल्यामुळे एअरलाइनच्या सेवेबाबत यापूर्वीदेखील छाननी करण्यात आली होती. २०२२ मध्ये, राणा दग्गुबती म्हणाले की,”त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध लावू न शकल्यामुळे हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात वाईट एअरलाइन अनुभव होता. इंडिगोकडे ‘फ्लाइटच्या वेळेबद्दल कोणतीही माहिती नाही’ असेही त्यांनी सांगितले. एअरलाइनने ‘गैरसोय’बद्दल दिलगिरी व्यक्त केली होती आणि त्यांचे सामान पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते.