सैनिकी ट्रेनिंग घेत असताना एक जवान विमानातून थेट जमीनीवर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जमिनीपासून जवळपास १६०० फूट उंचीवर विमान असताना हा जवान खाली कोसळला आहे. या विमानातील सर्व तरुणांनी पॅराशूट लावून खाली उडी घेतली असता, दुर्देवाने यामधील एका मुलाचे पॅराशूट वेळेवर न उघडल्याने तो जमीनीवर कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
डेली मेल या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना इंडोनेशियामधील असून, सैनिक सलमान क्रिसनेस हा इंडोनेशियाच्या ‘ऑरेंज बेरेट्स’चा सदस्य आहे. ८ नोव्हेंबर रोजी सलमान हा सुलेमान एअरबेस येथील ‘ट्रेनिंग एक्सरसाइज’मध्ये सहभागी होणार होता त्याच्या सरावा दरम्यान हा अपघात झाला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान हा हरक्यूलिस सी-130 या कमी उंचीवरुन उडणाऱ्या विमानातून उडी घेताना दिसत आहे.
सलमानसोबत त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील पॅराशूटच्या साह्याने विमानातून उडी घेतली. सर्वांची पॅराशूट वेळेवर उघडली. पण दुर्देवाने सलमानचे पॅराशूट उघडलंच नाही आणि तो थेट जमीनीवर कोसळला. सुदैवाने तो या अपघातून वाचला आहे. पण त्यालच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
जवानाची प्रकृती स्थिर –
आणखी वाचा- बापरे! झोपेलेल्या महिलेच्या तोंडात शिरला भलामोठा साप; अंगावर शहारे आणणारा Viral Video पाहिलात का?
दरम्यान, “पॅराशूटच्या दोऱ्या एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे सलमान ते उघडू शकला नाही. त्यामुळे जमीनीवर कोसळला. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. ” अशी माहिती क्विक रिएक्शन फोर्सचे प्रवक्ता कर्नल गुनवान यांनी दिली.
इंडोनेशियाची क्विक रिएक्शन फोर्स ही Kopasgat म्हणून ओळखले जाती, जी इंडोनेशियाच्या हवाई दलाचे एक एलिट युनिट आहे. या युनिटला ‘ऑरेंज बेरेट्स’ असं देखील म्हटलं जातं. ही टीम दहशतवादविरोधी कारवाया, विमान अपहरण, गुप्तचर ऑपरेशनमध्ये भाग घेते.