इंडोनेशियामध्ये भूकंप आणि त्सुनामी आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भूकंपामुळे हजारो लोकांची घरे उध्वस्त झाली असून यामध्ये ८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बेटावर १० फूट उंचीच्या लाटा आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. या लाटांचा जोर इतका जास्त होता की त्यामुळे पाणी इमारतींमध्ये शिरले आहे. येथील लोकांचे जीव वाचविण्यासाठी मदतकार्य वेगाने सुरु आहे. ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली. याच परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. त्याने बजावलेल्या कार्याबद्दल मृत्यूनंतर हिरो म्हणून त्याचे सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विमानातील प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी त्याने आपले प्राण दिले.
Indonesia Earthquake : विमानातील प्रवाशांचा जीव वाचवून इंडोनेशियातील तरुणाने सोडला प्राण
कर्तव्य बजावत असंख्य जणांचे प्राण वाचवून स्वत:चा जीव घातला धोक्यात
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-10-2018 at 18:22 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indonesia earthquake air traffic controller dies after ensuring last flight escapes