महिन्याभरापूर्वी पुण्यातल्या कर्वे रोडवर वाहनांची वर्दळ सुरू असताना मोठ्या इलेक्ट्रॉनिक फलकावर अचानक पॉर्नक्लिप सुरु झाली. आधीच रस्त्यावर वाहनांची गर्दी त्यातून अचानक पॉर्नक्लिप सुरू झाल्याने सगळ्यांच्या नजरा त्या फलकावर वळल्या आणि काही मिनीटांतच रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले. सोशल मीडियावर या प्रसंगाची चांगलीच चर्चा झाली होती. असाच काहीसा प्रकार इंडोनेशियातील जर्काताच्या रस्त्यावर घडला. जकार्ताच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या सुचना फलकावर अचानक जपानी पॉर्नक्लिप सुरू झाली, त्यामुळे भर रस्त्यात वाहतुकची मोठी कोंडी झाली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकाराला जबाबादार असलेल्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामागे एका २४ वर्षीय आयटी हॅकरचा हात असल्याचे समजते आहे. पाच मिनिटे सुचना फलकावर ही पॉर्न क्लिप सुरू होती. पोलीस आता या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. आपण केवळ मजेसाठी व्हिडिओ क्लिप चालवली असल्याचा दावा या मुलाने केला आहे. इंडोनेशियामध्ये पॉर्न मुव्ही बघणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे येथे पॉर्नवर बंदी घालण्यात आली आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या वेबसाईट्स देखील बॅन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यासाठी त्याला जवळपास ५ लाख १० हजारांचा दंड किंवा १२ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो अशी महिती येथल्या पोलिसांनी असोशिएट प्रेसला दिली आहे.