एरव्ही जगापासून चार हात लांब असलेल्या आणि शांततेत जीवन व्यतीत करणाऱ्या इंडोनेशियातल्या सुलावेसी बेटावर सध्या खूपच लगबग सुरू आहे. मृतदेहांना थडग्यातून उकरून त्यांना नटवण्यात सारा गाव व्यग्र आहे. घराघरांत आपल्या नातवाईकांचे, प्रियजनांचे मृतदेह सजवून ठेवलेले दिसत आहे. कोणी या मृतदेहांसोबत फोटो काढतोय तर कोणी मृतदेहाशेजारी बसून जेवणं करतंय. आपल्या सारखा माणूस या बेटावर गेला तर तो हे पाहून चक्रावून जाईल. कादाचित एखादं दुसरा बेशुद्धही पडेल.

ओळख लपवून ‘तो’ राजा करायचा वैमानिकाची नोकरी

मृतदेह पुरुन दफन विधी एकदा झाला की पुन्हा तो मृतदेह बाहेर काढला जात नाही हे आपल्याला माहिती असेलच. पण या बेटावर मात्र थडग्यात पुरलेल्या मृतदेहाला बाहेर काढलं जातं. या मृतदेहांना नवीन कपडे, दागिने घालून सजवलं जातं. काही घरांत तर नातेवाईकांचा मृत्यू झाला की त्यांना कित्येक दिवस दफनही केलं जातं नाही. मृतदेहावर रासायनिक प्रकिया करून तो जतन केला जात असल्याची माहिती ‘डेली मेल’नं दिली आहे. ही सारी टोराजॅन समाजातील लोक आहे. त्यांचा मरणावर विश्वास नाही. मरणानंतरही त्या व्यक्तीचा जीवन प्रवास सुरू राहतो, अशी या लोकांची धारणा आहे. त्यामुळे दरवर्षी ‘मानेने’ असे नाव असलेल्या सणात ते मृतदेहांना उकरून बाहेर काढतात. शरिराने आपल्यात नसलेल्या नातेवाईक आणि प्रियजनांसोबत वर्षांतून एक दिवस ते या सणाच्या निमित्ताने घालवतात. घराघरांत लज्जतदार पदार्थांची दावत असते. घरात गोड, तिखट असे विविध पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांवर घरातील मंडळी ताव मारतातच पण त्याचबरोबर मृतदेहालादेखील पदार्थांचा भोग दाखवला जातो.

Video : ‘या’ मुलामुळे आनंद महिंद्रा झाले प्रेरित; कोणतेही काम कठीण नसल्याचे ट्विट

Story img Loader