अजगराने माणसांना जिवंत गिळलेलं तुम्ही ऐकलं असेल, पण माणसांनी अजगरावर ताव मारल्याचं तुम्ही फार क्वचितच ऐकलं असेल. इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटावर बतांग गन्साल जिल्ह्यात गावकऱ्यांनी चक्क २५ फुटांच्या अजगराची शिकार करून त्याला तळून खाल्ल्याचं समोर आलं आहे. ताव मारण्याआधी गावकऱ्यांनी या भल्यामोठ्या अजगराला प्रदर्शनासाठी पामच्या झाडावर टांगून ठेवले होते.

येथे राहणारे सुरक्षारक्षक रॉबर्ट नबाबन घरी परतत असताना त्यांना शेतात भलामोठा अजगर दिसला. या अजगराला त्याने पकडण्याचा प्रयत्न केला. या अजगराची लांबी जवळपास २५ फूट होती. अजगराने रॉबर्टवर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमीदेखील झाले. त्यानंतर गावात येऊन शेतात अजगर पाहिल्याची माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी मिळून या भल्यामोठ्या अजगराला ठार केलं आणि त्यानंतर गावकऱ्यांनी अजगराला प्रदर्शनासाठी देखील ठेवलं.

सॉरी आजी! यापुढं पदार्थ प्रेमानं तयार करून विकता येणार नाहीत…

सध्या येथे पामच्या लागवडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट असतो. उंदरांची शिकार करण्यासाठी अजगर येथे येतात. त्यामुळे शेतात अजगर दिसणं गावकऱ्यांनी काही नवं नाही. पण काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियामध्ये एका शेतकऱ्याला अजगराने जिवंत गिळलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अजगराविषयी मोठी दहशत आहे आणि याच भीतीमुळे गावकऱ्यांनी अजगराला ठार केल्याचं बोललं जातं आहे.अजगराला ठार केल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्यावर यथेच्छ ताव मारला. नबाबनच्या मते अजगर चविष्ट लागतो तसेच त्याच्या रक्तात औषधी गुणधर्म असतात. म्हणून गावकऱ्यांनी त्याच्यावर ताव मारला.

ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती; कुटुंबाला कंपनीकडून स्पेशल गिफ्ट

Story img Loader