Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून, यामध्ये एका व्यक्तीने ब्रेकऐवजी चक्क ॲक्सिलेटर दाबला.. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरधाव वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच भरधाव वाहन चालवताना नियंत्रणात न आल्याने दुर्घटना होण्याचेही प्रकार समोर आले आहेत. इंदूरमध्ये भीषण अपघात घडला आहे. ज्यामध्ये सिग्नलवर कार थांबवण्याऐवजी कारमध्ये बसलेल्या डॉक्टरने चुकून एक्सलेटर दाबला आणि कार थेट समोरच्या कारला धडकली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाला. ज्या गाडीला डॉक्टरांच्या गाडीची धडक बसली. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

या व्हिडिओचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वेगवान नॅनो कार येते आणि समोर उभ्या असलेल्या कारला धडकते. डॉक्टर मुकेश तिवारी असे मृत डॉक्टरचे नाव आहे.ते बीसीएम हाईट्समध्ये राहत होते आणि खाजगी प्रॅक्टिस करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी केस कापून ते घरी परतत होते तेव्हा ही दुर्घटना घडली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘हाई झुमका वाली पोर’ गाण्यावर काकूंचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे ओ फक्त”

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @sanjaygupta1304 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एकानं कमेंट केलीय की, “मृत्यू कुणालाच रोखता येत नाही” तर आणखी एकानं या सगळ्याचा दोष डॉक्टरांना दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indore doctor dies after his out of control car hits another car waiting at signal cctv clip surfaces shocking video goes viral srk