उद्योजक आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमीच सक्रीय असतात. भारतातील व्यावसायिक संस्कृती यासोबतच व्हायरल व्हिडीओ अशा अनेक गोष्टी ते ट्विटरला शेअर करत असतात. आनंद महिंद्रा ट्विटरवर संवाद साधणाऱ्यांना किंवा मदत मागणाऱ्यांना उत्तरही देत असतात. त्यांच्या उत्तरांनी अनेकदा नेटकऱ्यांची मनं जिकली आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांना वाहननिर्मितीत स्पर्धक असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुडघाभर पाण्यातून रस्ता पार करण्यासाठी तरुणाने केला भन्नाट जुगाड; Video पोस्ट करत आनंद महिंद्रा म्हणाले…

एका युजरने ट्विटरला आनंद महिंद्रा यांना प्रश्न विचारला होता. झालं असं की, लेखक हरिंदर सिक्का यांनी ट्वीट करत महिंद्राच्या XUV700 चं कौतुक केलं होतं. उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये, स्टीयरिंग, सीट, लेग स्पेस, गॅझेट्स आणि सेन्सर्स असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं होतं.

Viral Post : ट्विटर युजरने आनंद महिंद्रा यांना विचारली त्यांची पात्रता; उत्तराने जिंकले सर्वांचे मन

यावर आनंद महिंद्रा यांनी कोणताही पक्षपात न करणाऱ्या लोकांकडून सर्वात चांगली प्रतिक्रिया मिळत असते सांगत हरिंदर यांचे आभार मानले. तसंच आपल्या ऑटो टीमला याचं श्रेय दिलं.

यानंतर एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये “‘टाटा कार्सबद्दल तुमच्या भावना काय आहेत?” अशी विचारणा केली.

यावर आनंद महिंद्रा यांनी उत्तर देत सांगितलं की. “टाटा मोटर्ससारखे तगडे स्पर्धेक असणं आमच्या अभिमानास्पद आहे. ते नेहमीच नव्याने स्व:तला शोधत असतात आणि यामुळे आम्हाला आणखी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते. स्पर्धेमुळे नवनिर्मितीला चालना मिळते”.

आनंद महिंद्रा यांच्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिकंली आहेत. एका युजरने आनंद महिंद्रांचं कौतुक करत म्हटलं की, “आपल्या स्पर्धकाचं कौतुक करणारे फार कमी असतात. तुम्ही हे कौतुक करणं फारच लक्षणीय आहे. तुम्ही ज्याप्रकारे क्षेत्राकडे पाहता हे कौतुकास्पद आहे”.

दरम्यान एका युजरने, वाहननिर्मिती क्षेत्रात मैत्रीपूर्ण स्पर्धा असल्यास लोकांना चांगल्या गोष्टी मिळत राहतील, असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrialist anand mahindra answers question on tata motors by twitter user wins internet sgy
Show comments