सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्या व्हिडीओतील आयडीया पाहून मोठमोठ्या उद्योगपतींनाही ते शेअर करण्याचा मोह आवरता येत नाही. मग ते आनंद महिंद्रा असोत वा हर्ष गोयंका. सध्या हर्ष गोयंका यांनी असाच एक देशी जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
हो कारण गोयंका यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक शेतकरी भररस्त्यातून मेंढ्या घेऊन जाताना दिसत आहे. मात्र, या मेंढ्यांना घेऊन जाण्यासाठी या पठ्ठ्याने असं काही जुगाड केलं आहे जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. मेंढ्यांचा कळप सांभाळणं किती अवघड काम आहे हे गावाकडील लोकांना चांगलंच माहिती आहे. कारण मेंढ्या कधीच एका जागी शांत उभ्या राहत नाहीत. शिवाय त्यांना एखाद्या रहदारीच्या रस्त्यावरुन घेऊन जाणंही खूप अवघड असते. मात्र, मेंढ्याना व्यवस्थित आणि एका रांगेत घेऊन जाण्यासाठी एका शेतकऱ्याने सर्व मेंढ्या एका चालत्या पिंजऱ्यातून घेऊन जाताना दिसत आहे.
हेही पाहा- समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमधून फोटोग्राफरने कैद केला ‘जलदेवी’चा चेहरा, Viral फोटो पाहून व्हाल थक्क
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक शेतकरी त्याच्या तीनचाकी गाडीच्या मागील बाजूला एक पिंजरा बांधला आहे. त्या पिंजऱ्याला चाकंही लावली आहेत आणि त्यामध्ये सर्व मेंढ्या चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा शेतकरी मुख्य रस्त्यावरुन जात असताना मेंढ्या सुखरुप आणि एका रांगेत घेऊन जात असल्याचं पाहून अनेकांनी त्याच्या जुगाडाचं कौतुक केलं आहे. उद्योगपती हर्ष गोयंकादेखील हा व्हिडीओ पाहून थक्क झाले असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कठीण समस्येचा सोपा उपाय, जुगाड”
हेही पाहा- Video: तरुणाचा लग्नातील तो डान्स अखेरचा ठरला; लोक शिट्टी वाजवत राहिले आणि तो मृत्यूशी झुंजत…
हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओतील व्यक्तीच्या जुगाड कौशल्याला अनेकांनी दाद दिली आहे. रस्त्यावरुन जाताना वाहनांपासून प्राण्यांना इजा होणार नाही याची काळजी या शेतकऱ्याने अतिशय चांगल्या पद्धतीने घेतली असल्याचं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. तर एका नेटकऱ्याने “जुगाड हे सर्वोत्तम तंत्र असल्याचंही कमेंटमध्ये लिहिलं आहे.