यंदाचं टी२० विश्वचषक अतिशय रंजक ठरलंय. प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही उत्कंटावर्धक गोष्टी पाहायला मिळत आहेत. विशेषतः भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरला. यावेळी विराट कोहलीची उत्कृष्ट खेळीही पाहायला मिळाली. भारताचा क्रिकेट सामना प्रत्येकालाच लाइव्ह पाहायचा असतो. मात्र, कामाच्या गडबडीत आपल्याला सर्व सामने पाहायला मिळतीलच असेही नाही. असाच काहीसा प्रसंग एका व्यक्तीवर ओढवला. प्रवासात असल्यामुळे या व्यक्तीला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना पाहता आला नाही. मात्र यावेळी त्याने विमानाच्या पायलटलाच सामन्याचा स्कोअर विचारला. यावर त्याला जो प्रतिसाद मिळाला ते पाहून तुम्हीही खुश व्हाल.

रविवारी ३० ऑक्टोबरला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना खेळला गेला. यावेळी एक इसम इंडिगो फ्लाइटमधून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने फ्लाइटच्या पायलटकडे स्कोअरचा अपडेट मागितला. यानंतर पायलटने या प्रवाशांसाठी चक्क कागदावर स्कोअर लिहून पाठवला. या कृतीने प्रवासी खूपच खुश झाला आणि त्याने या कागदाचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच

PAK vs ZIM नंतर ट्विटरवर ट्रेंड होतंय ‘PAK Bean’; ‘ही’ घटना ठरली कारणीभूत

विक्रम गर्ग असे या प्रवाशाचे नाव असून त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहलंय, “आज भारत हरला मात्र इंडिगोच्या पायलटने माझे मन जिंकले आहे. सामन्याचा स्कोअर विचारला असता पायलटने मला स्कोअर लिहलेली एक नोट पाठवली.” ३० ऑक्टोबरला करण्यात आलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. यावर इंडिगो कंपनीचीही प्रतिक्रिया आली आहे. इंडिगोने म्हटलंय, “हे पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही तुम्हाला लवकरच फ्लाइटवर पुन्हा भेटण्यास उत्सुक आहोत.”

लंडनच्या रस्त्यावर तरुणाने गायलं ‘केसरिया’ गाणं, अन्…; हा Viral Video पाहाच

टी२० विश्वचषक २०२२ ३० वा सामना पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने पाच गडी राखून हा सामना जिंकला. या विजयाने आफ्रिका संघ उपांत्य फेरीच्या एक पाऊल अजून जवळ गेला आहे. एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार भागीदारीने भारताला विजयापासून लांब नेले.

Story img Loader