अरुणाचल प्रदेशातील ईटानगरमधील एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये चिमुकला बोबड्या आवाजामध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गात आहे. चिमुकला अतिशय निरागसपणे ‘जन गण मन’ म्हणत आहे. राष्ट्रगीत गाताना त्याचे अनेक शब्द एकत्र होतात, मध्येच तो अडखळतोय पण. मध्येच तो काही शब्द विसरतोय. पण ज्या अंदाजानं आणि तेवढ्या जिद्दीनं त्या चिमुकल्यानं राष्ट्रगीत पूर्ण केलं. त्या चिमुकल्यानं आपल्या राष्टगीतानं सर्व नेटीझन्सचे ह्रदय जिंकले आहे.

 

चिमुकल्याचा हा व्हिडीओ अनुपम बोरडोलोई नावाच्या ट्विटर यूजरनं पोस्ट केला आहे.


‘अरूणाचल प्रदेशमधील हा चिमुकला ज्या प्रकारे राष्ट्रगीत गात आहे ते सर्वात क्यूट आहे’ असे कॅप्शन त्यानं दिलं आहे.

अनुपम बोरडोलोईनं व्हिडीओ पोस्ट करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटीझन्सही चिमुकल्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.