१९५२ साली भारतातून चित्ता विलुप्त झाल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर ७० वर्षांनी भारतात पुन्हा चित्ते पाहता येणार आहे. ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत आफ्रिकेतील नामिबिया येथून काही चित्ते भारतात आणण्यात आले. हे चित्ते पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील जंगलात सोडण्यात आलेले आहे. भारतात पुन्हा चित्त्याला स्थापित करण्याच्या हेतूने असे करण्यात. एका विशेष विमानाने या चित्त्यांना भारतात आणण्यात आले. हा आधीच आपल्या लूकमुळे चर्चेत आला आहे. आता या विमानाचा आतील भाग दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रविना टंडन यांनी हा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये चित्त्यांना भारतात आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या विमानाच्या आतील भागाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. बोइंग ४७४ या विमानाचे हे दृश्य असून त्याने नामिबिया येथून चित्ते भारतात आणण्यात आले. व्हिडिओमध्ये विमानात ज्या पिंजऱ्यांमध्ये चित्ते ठेवण्यात आले होते त्या पिंजऱ्यांचेही दृश्य दाखवण्यात आले आहेत.
(Viral Video : केरळ येथील व्यक्तीने मुलांच्या सुरक्षेसाठी उचलली बंदूक, कारण जाणून हैराण व्हाल)
विमानात बॉक्समध्ये चित्ते
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमानाची वैशिष्ट्ये सांगताना तुम्हाला ऐकू येईल. ही व्यक्ती आधी विमानातील फस्ट क्लास प्रवासी बैठक व्यवस्था दाखवते नंतर तेथून चार डब्यांकडे घेऊन जाते. या चार डब्यांमध्ये चित्त्यांना ठेवल्यात आल्याचे ही व्यक्ती सांगते. तसेच ही व्यक्ती उरलेली इतर चार डब्बे देखील दाखवते. त्यानंतर विमानाचे स्पेअर पार्ट ही व्यक्ती दाखवते.
यामुळे विमान ठरले लक्षवेधी
भारत सरकारचा महत्वाकांशी उपक्रम ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत नामिबिया येथून काही चित्ते भारतात आणण्यात येणार आहे. त्यासाठी भारतातून नामिबिया येथे एक विमान पाठवण्यात आले आहे. या विमानाच्या समोरच्या भागावर वाघाचा भव्य चेहरा काढण्यात आला असून तो लक्षवेधी ठरत आहे.
नेटकरी म्हणाले
व्हिडिओला २१ हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. रविना टंडन यांनी पोस्टला कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे. आपण आपल्या वाढदिवशी ही छान भेट दिली, याबद्दल धन्यवाद, असे त्यांनी कॅप्शनध्ये लिहित आभार मानले आहे. मात्र यावर काही नेटकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
एका युजरने पंतप्रधानांवर टीका केली आहे. या प्रकल्पावर पूर्वीपासूनच काम चालू होते. ते केवळ तत्कालील सरकारच्या कामांचे क्रेडिट घेतात असे एका युजरने लिहिले आहे. तर एका युजरने संकट असताना चित्त्यांची गरज होती का? असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने भारताच लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचे आधी संरक्षण करावे असे लिहिले आहे.