एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची प्रेरणादायी यशोगाथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकेकाळी झोमॅटो, स्विगी (Zomato, Swiggy) वरून जेवण पोहचवणारा हा तरुण आता एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. शेख अब्दुल सत्तार यांने त्यांचा संघर्ष लिंक्डइनवर शेअर केला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये शेखने सांगितले की, पूर्वी तो ओला, स्विगी, उबेर, रॅपिडो आणि झोमॅटोमध्ये काम करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होता.
“मी एक डिलिव्हरी बॉय आहे, माझे एक स्वप्न आहे. मी ओला, स्विगी, उबेर, रॅपिडो आणि झोमॅटो सोबत काम केले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षापासून मी सर्वत्र काम करत आहे. माझे वडील कंत्राटी कामगार असल्याने आमच्याकडे बेसिक गरजा पुरतील एवढेच पैसे होते. त्यामुळे जास्तीत जास्त काम करून कुटुंबाला मदत करायची होती. मी सुरुवातीला भित्रा होतो, पण डिलिव्हरी बॉय झाल्याने मला खूप काही शिकायला मिळाले.”
(हे ही वाचा: घोडीसोबत उचलून नवरदेवाला लोकांनी बसवलं खाटेवर आणि हवेतच…; बघा वरातीतला भन्नाट Video)
आपली कथा सांगताना शेख अब्दुल सत्तार म्हणाला की, त्याच्या एका मित्राने त्याला कोडिंग कोर्समध्ये जाण्याचा आग्रह धरला. यामुळे त्याला सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्यास मदत झाली.
(हे ही वाचा: नवरीने रागाने वरमाळा नवरदेवाच्या गळ्यात फेकली आणि…; बघा हा Viral video)
पूर्ण केले स्वप्न
शेख अब्दुल यांने असेही सांगितले की कोडिंग शिकण्यासाठी त्याने संध्याकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत डिलिव्हरीचे काम केले. मी माझ्या नोकरीतून जे पैसे कमावले, ते मी पॉकेटमनी म्हणून आणि माझ्या कुटुंबाच्या छोट्या गरजांसाठी वापरत असे. लवकरच मी स्वतः वेब ऍप्लिकेशन्स तयार करायला सुरुवात केली. मी काही प्रोजेक्ट पूर्ण केले आणि नोकरीसाठी कंपन्यांकडे अर्ज करण्यास सुरुवात केली.
(हे ही वाचा: Video: ३६ इंचाचा नवरदेव ३१ इंचाची नवरी; जळगावात फार पडला अनोखा विवाह सोहळा)
याशिवाय शेख अब्दुल सत्तार म्हणाला की, डिलिव्हरी एजंट म्हणून काम केल्याचा मला अभिमान आहे कारण त्या कामामुळे त्यांला खूप काही शिकवले. “माझ्या डिलिव्हरी बॉयच्या अनुभवामुळे मला लोकांशी संवाद साधण्यास मदत झाली.”