इंस्टाग्राम हा सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या अॅपपैकी एक आहे. भारतातचे नव्हे जगभरात इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दरम्यान भारतातात इंस्टाग्राम बंद पडल्याने अनेक वापरकर्ते वैतागले आहेत. मेटाच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मवर व्यापक समस्या निर्माण होत आहे. क्राउड-सोर्स्ड आउटेज ट्रॅकिंग सेवा, डाउनडिटेक्टरच्या मते, असंख्य वापरकर्त्यांनी सकाळी ११:१५ च्या सुमारास ॲपमध्ये प्रवेश करण्यात अडचणी नोंदवण्यास सुरुवात केली. गुगलवरही Instagram हा किवर्ड ट्रेंड होत आहे.
इंस्टाग्राम पडलं बंद
डाउनडिटेक्टर डेटावरून असे दिसून आले आहे की, ६४% पेक्षा जास्त वापरकर्त्यांना ॲपमध्ये लॉग इन करण्यात समस्या होत्या. २४% वापरकर्त्यांना सर्व्हर कनेक्शन समस्या होत्या. वेबसाइट वापरकर्त्यांसह अनेक स्त्रोतांकडून स्थिती अहवाल एकत्र करून आउटेजचा मागोवा घेते.
वापरकर्ते इंस्टाग्रामवर ज्या समस्यांना तोंड देत होते ते शेअर करण्यासाठी X (पूर्वीचे ट्विटर) चा वापर केला. काही वापरकर्त्यांना एक एरर मेसेज दिसत होता होता ज्यामध्ये असे म्हटले होते की, ‘काहीतरी चूक झाली आहे (Something has gone wrong)
X वरील एका वापरकर्त्याने प्रश्न केला की इंस्टाग्राम खरोखरच सर्व वापरकर्त्यांसाठी बंद आहे का? त्यांनी लिहिले, “इंस्टाग्राम डाउन आहे, मला वाटले की, फक्त मला इंटरनेट समस्या आहे?”
दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “instagram down 8/10/2024. Instagram शिवाय आयुष्य अधिक सुंदर आहे.”
हेही वाचा –Video : झोमॅटोचे सीईओ झाले फूड डिलिव्हरी बॉय; ऑर्डर देताना आला धक्कादायक अनुभव, मॉलमध्ये जाताच….
“इन्स्टाग्राम आता नाही,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.
जूनमध्ये, मेटा-मालकीच्या ॲपला जागतिक आउटेजचा सामना करावा लागला. वेबसाइट आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, ६,५०० हून अधिक वापरकर्त्यांनी १२.०२ वाजताच्या सुमारास भारतातील इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताना समस्या नोंदवल्या.
सुमारे ५८ टक्के लोकांनी फीडमध्ये समस्या, ३२ टक्के ॲपमध्ये आणि १० टक्के सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या आल्या.
पुणे, दिल्ली, जयपूर, लखनऊ, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि इतर भागातील वापरकर्त्यांना ॲपसह समस्यांचा सामना करावा लागला.
गुगलवर ट्रेंड होत आहे इंस्टाग्राम
इंस्टाग्राम बंद पडल्याने अनेक लोक गुगरलवर Instagram किवर्ड सर्च करत आहे. गेल्या तासाभरात ५० हजारपेक्षा जास्त लोंकांनी याबाबत सर्च केल आहे त्यामुळे गुगल ट्रेंडच्या टॉप २५ ट्रेंडमध्ये Instagram हा किवर्ड ट्रेंड होत आहे.