पावसाळ्याच्या ऋतूत संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. सर्वत्र हिरवळ पसरते. अशा वातावरणात निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याची मजाच वेगळी आहे. महाराष्ट्रात अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात. पावसाळ्यात या ठिकाणांचं सौंदर्य आणखीनच खुलतं. डोंगर, दऱ्या, धबधबे, गाद-किल्ले हे पावसाळ्याच्या सहलीचं आकर्षणाचं ठिकाण.
सध्या सह्याद्रीनेही हिरवा शालू ओढून घेतला आहे. त्यामुळे ही पर्वतरांगा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतेय. दरम्यान येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक मुलगा डोंगराच्या कड्यावर उभा राहून बाटलीमधलं पाणी खाली ओतत आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये काय विशेष आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.
या व्हिडीओमध्ये एक मुलगा डोंगराच्या कड्यावर उभा राहून बाटलीमधलं पाणी खाली ओतत आहे. मात्र हे पाणी खाली जाण्याऐवजी वर हवेत उडत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच गोंधळले आहेत. या ठिकाणी खालून वर वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग इतका जास्त आहे की हे पाणी खाली पाडण्याऐवची हवेत वर उडत आहे. हा व्हिडीओ हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावर शूट करण्यात आला आहे.
नाणेघाटातील उलट दिशेने वाहणारा धबधबा देशभरात ठरतोय चर्चेचा विषय; Viral Video तुम्ही पाहिला का?
प्रथमेश पाटील याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ २० लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १८ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.