मुलींना गाडी चालवता येत नाही, त्या चांगल्या ड्रायव्हर नसतात असं अनेकदा म्हटलं जातं. मुली गाडी कशा चालवतात याची अनेक उदाहरणे आपण सोशल मिडीयावर अनेकदा पाहिली आहेत. मुली गाडी चालवतात तेव्हा अनेकवेळा अपघात घडतात. यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं. यासंबधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहिजे असतीलच. यात आणखी एका व्हिडिओची भर पडलीये.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन उभी असलेली दिसत आहे. त्यानंतर ती उजवीकडे वळते. तिच्या डाव्या बाजूला एक मोठा नाला देखील आहे. त्याठिकाणी ही तरुणी एक्सलेटर वेगाने वाढवते. आणि थेट जाऊन नाल्यात पडते. या तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: मुलीने वडिलांचा गुपचूप Video बनवला; त्यानंतर जे दिसलं ते पाहून भारावून जाल)
gieddee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण यावर वेगवेगळ्या कंमेंट देखील करत आहेत. तसंच काहीजण या तरुणीची खिल्ली देखील उडवत आहेत. हा व्हिडिओ अगदी काही वेळातच व्हायरल होताच कमालीचा व्हायरल होत आहे.