बिहारमध्ये दारूबंदी आहे, मात्र येथील दारुबंदी केवळ सांगण्यासाठीच आहे की काय? असा प्रश्न पडावा अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत. कारण अनेक लोकं बिहारमध्ये बेकायदेशीरपणे दारूची विक्री करत आहेत, याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय चोरुन दारूची विक्री करण्यासाठी विविध पद्धती अवलंबल्या जातात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये विक्रीसाठी दारुच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या एका कारचा अपघात झाला आहे. पण या अपघाताचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण कारचा अपघात होताच लोकांनी ड्रायव्हरला वाचवण्याऐवजी थेट कारमधील दारुच्या बाटल्या लुटायला सुरुवात केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर बिहारमधील गया येथे दारूने भरलेल्या कारचा अपघात झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अपघातानंतर कारमध्ये दारू असल्याचं समजताच लोकांनी मदत करायची सोडून थेट कारमधील बाटल्या पळवून न्यायला सुरूवात केल्याचंही दिसत आहे. यावेळी अपघातामध्ये ड्रायव्हरला काही दुखापत झालेय का? तो किती जखमी झालाय? याची कोणी साधी चौकशीही केली नसल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- संतापजनक! अंथरुणाला खिळलेल्या सासऱ्यांसोबत सुनेचं अमानुष कृत्य; चादर पेटवली, शिवीगाळ केली अन्…VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध एका कारचा अपघात झाल्याचं दिसत आहे. अपघात झालेल्या कारमधील दारुच्या बाटल्या घेऊन लोक सैरावैरा पळत आहेत. यावेळी त्याच रस्त्यावरुन अनेक वाहने जाताना दिसत आहेत. मात्र कोणालाही त्याची भीती वाटत नसून लोक फक्त दारूच्या बाटल्या पळवण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, “दारुच्या बाटल्यांपुढे कोणालाही कायद्याची भीती आणि जीवाची पर्वादेखील नाही.” दुसऱ्या एकाने लिहिलं, “हे सिद्ध झालं की, दारूबंदीमुळे लोक दारू पिणे बंद करत नाहीत, उलट अनेकदा ते विषारी दारू पितात, जे अधिक धोकादायक आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “या लोकांना जीवापेक्षाही दारू महत्त्वाची आहे, शेजारुन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचीही त्यांना भिती वाटत नाहीये, ते फक्त दारु पळवण्यात व्यस्त आहेत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instead of saving the driver in the accident car people ran away with the liquor bottles video goes viral jap