शरीरासाठी व्यायाम चांगला असतो, त्याने आरोग्य सुधारतं वगैरे सगळं आपल्याला माहीत असतं. पण व्यायाम प्रत्यक्ष करणं म्हणजे सकाळी लवकर उठा, रोजच्या धकाधकीतून वेळ बाजूला काढा, जिम लावली असेल तर तिकडे जा आणि हाशहुश करत व्यायाम करा अस सगळे प्रकार करावे लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिममध्ये ट्रेडमिल हा प्रकार सगळ्यात सोपा. चालत रहा, चालत रहा. त्यामध्येही आपण तीनतीनदा थांबणार. जेवढा वेळ ट्रेनरने सांगितलं आहे तेवढा वेळ पूर्ण करतानाही नाकीनऊ येणार

पण या ट्रे़डमिलचा जन्म कसा झाला हे माहीत आहे का? आधुनिक काळात व्यायामाचं साधन म्हणून रूढ झालेल्या ट्रेडमिलचा जन्म चक्क तुरूंगात झाला होता.

तुरूंगामध्यो तयार केली गेली ‘ट्रेडमिल’

तुरूंगामधल्या या ट्रेडमिलचा जन्म कैद्यांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी मुळीच झाला नव्हता तर त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी या ट्रेडमिलचा वापर होत होता. एकोणिसाव्या शतकात तयार झालेल्या ‘ट्रेडमिल’वर कैद्यांना चढवण्यात यायचं. या ट्रेडमिलवर चढलं की या कैद्यांना चालावंच लागायचं. कारण जर ते चालले नाहीत तर ते खाली पडतील अशी निर्दयी व्यवस्था इंग्लंडमधल्या या तुरूंगांमध्ये केली असायची. या ‘ट्रेडमिल’ना त्या तुरूंगामधली पाणी उपसण्याची यंत्रणा जोडलेली असायची. क्वचित प्रसंगी धान्य दळायच्या गिरणीचं जातं या ट्रेडमिलला जोडलेलं असायचं.

आणि अर्थातच या ट्रेडमिल्स आपल्या जिममधल्या ट्रेडमिलसारख्या छान गुळगुळीत नसायच्या, खडबडीत चाकांवर उभं राहत प्रचंड जोर लावत या तुरूंगांमधल्या ट्रेडमिल्स खेचाव्या लागायच्या. आपण आपल्या ट्रेडमिल्सवर जास्तीत जास्त १५ मिनिटं चालतो. त्यातही मिनिटा मिनिटाला थांबायचा मोह होतो. पण इंग्लंडमधल्या या निर्दयी ट्रेडमिल्सवर या कैद्यांना सहा -सहा तास चालायला लावत त्यांच्याकडून काम करून घ्यायचे.

हे सगळं वाचल्यावर काळ्यापाण्याच्या शिक्षेतला कोलू आठवतो आणि मनही शहारतं!

[jwplayer 6ZnlDdDr]