Intern Stipend Expectations Upto 50 Thousand : नोकरी शोधताना किती संघर्ष करावा लागतो, याचा अनुभव काही जणांना आलाच असेल. कारण नामांकित कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी काही माणसं इंटर्नशिप करताना स्टायपंडची मागणीही करत नाही. कारण ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्या कंपनीत नोकरी मिळण्याची आशा त्यांना लागलेली असते. मात्र, काही जण त्यांचे कौशल्य पाहून इंटर्नशिपमध्येच मोठ्या पगाराची मागणी करतात. असाच एक भन्नाट प्रकार उघडकीस आला आहे. एका इंटर्नने पाच तासांच्या कामासाठी चक्क ५० हजारांच्या पगाराची मागणी केली आणि सर्वच कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

इन्फीडो मध्ये पीपुल्स सक्सेसची निर्देशक समीरा खानने नुकतच जेन झेड इंटर्नच्या मुलाखतीच्या अनुभवाबद्दल ट्वीटरवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी जेन झेडमध्ये मागणवण्यात आलेल्या वर्क लाईफ बॅलेंसबद्दल या पोस्टच्या माध्यमातून विरोध केला आहे. खान यांनी ट्वीटर पोस्टवर उल्लेख करत म्हटलंय की, ती एक जेन झेड इंटर्नची (Gen Z Intern) मुलाखत घेत होती. तो वर्क लाईफ बॅलेंसच्या शोधात होता आणि ५ तासांहून अधिक काम त्या इंटर्नला करायचं नव्हतं.

Indore Doctor Dies After His Out-Of-Control Car Hits Another Car Waiting At Signal
VIDEO: “मृत्यू कुणालाच रोखता येत नाही” केस कापायला गेलेल्या डॉक्टरांचा भयंकर शेवट; एक चूक अन् कसा झाला शेवट पाहाच
Dance video woman dance on Hai Jhumka Vali Por song video goes viral
‘हाई झुमका वाली पोर’ गाण्यावर काकूंचा तुफान डान्स;…
Emotional video of a couple girlfriend seating on a road with boyfriend viral video on social media
सगळ्या मुली सारख्या नसतात! कठीण काळातही तरुणीने सोडली नाही साथ, कपलचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
Girl racing up on scooty with a bike fall down badly on scooty shocking funny video goes viral
काय गरज होती का गं? मुलाकडे बघण्याच्या नादात स्कूटीवरुन धपकन पडली तरुणी; ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल
bhandara feast fast food service viral video
भावांच्या स्पीडला तोड नाही! भंडाऱ्यात अवघ्या सेकंदात शेकडोंना वाढल्या प्लेट, डिश अन् जेवण, VIDEO पाहून युजर्स शॉक
no leave blackout social viral
“तुम्ही मेलात तरी तुम्हाला तीन दिवस आधी कंपनीला सांगावं लागेल”, नेटिझन्सचा संताप; सुट्ट्या रद्द करणारी कंपनीची नोटीस व्हायरल!
Why Are Village Girls More Attracted To City Boys reaons make you laugh Funny Video
VIDEO: गावातल्या मुलींना शहरातली मुलं जास्त का आवडतात? तरुणींची उत्तर ऐकून कळेल गावच्या पोरांची लग्न का ठरत नाही
Deepinder Goyal Zomato Recruitements
Zomato CEO : बिनपगारी अन् फुल्ल अधिकारी, झोमॅटोच्या ‘या’ पदासाठी आले दहा हजार अर्ज; नियम अन् अटी तर वाचा!
disgusting video girl went out on the road to reporting in bra and panty
भररस्त्यात इन्फ्लुएंसर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; ब्रा-पँटी घालून लोकांकडे जायची अन्…, VIDEO पाहून संतापले युजर्स

नक्की वाचा – पायावर नाग सोडून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या! नवीन बॉयफ्रेंड मिळाला, पण पोलिसांनी…

त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, मी आज एका जेन झेड इंटर्नची मुलाखत घेत होती आणि त्याने सांगितली की मी ५ तासांच्या कामासोबत वर्क लाईफ बॅलेंसच्या शोधात आहे. इंटर्नने असंही म्हटलं की, त्याला एमएनसी कल्चर आवडत नाही आणि त्याला एका स्टार्ट अपमध्ये काम करायचं आहे. तसंच ४०-५० हजार स्टायपंडची मागणीही केली.

जेन झेड इंटर्नच्या मागणीने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, स्टार्ट-अप मध्ये रोज ५ तास काम? जबरदस्त….दुसऱ्या यूजरने ट्वीटरवर म्हटलं, त्यांना ५ वर्षांपर्यंत आठवड्याला १०० तास काम करण्यासाठी आणि वरिष्ठ पदावर पोहोचण्याची आवश्यकता आहे. तरच त्यांना त्यापेक्षा कमी कामासाठी ४०-५० लाख रूपये मिळू शकतात. तिसऱ्या यूजरने म्हटलं, तीन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर तो अचानक काम सोडेल आणि इथं काम करायला मजा येत नाही, असं सांगेल.