आंतरराष्ट्रीय चुंबन दिन अर्थात International Kissing Day हा दरवर्षी ६ जुलै रोजी साजरा केला जातो. फ्रेंच किस पासून ते हॅलो किस किंवा गुडबाय किस पर्यंत केल्या जाणाऱ्या किससह आज दोन लोकांमधील नातं साजरा करण्याचा दिवस आहे. या किसिंग डेची सुरवात २००० च्या दशकात युनायटेड किंगडममध्ये अर्थात यूकेमध्ये झाली आणि त्याचा अवलंब जगभरात करण्यात आला. व्हॅलेंटाइन वीकमध्येही वीकचा सहावा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. तुमच्या जवळच्या व्यक्तींमधलं प्रेम कायम राहो आणि दिवसागणिक ते वाढो यासाठी आजचा हा दिवस नक्कीच खास आहे.
KISS शब्दाची जन्मकहाणी
किस (Kiss) हा शब्द जुन्या इंग्रजीमधील ‘सीसन’ (Cyssan) या शब्दापासून जन्माला आला आहे. ‘सीसन’चा अर्थ होतो चुंबन घेणे. पण आता हा सीसन शब्द नेमका कुठून आला याची अचूक माहिती कोणालाच नसेल. परंतु, अनेकांच्या मते चुंबन घेताना लोक जो आवाज करतात त्यावरून या मूळ शब्दाची निर्मिती झाल्याचं म्हटलं जातं. रोमनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या किसला बॅसियम (basium), ऑस्कूलम (osculum), सॅव्हियोल्यूम (saviolum) या नावांनी ओळखले जात असे. तर ग्रीक भाषेमध्ये चुंबनासाठी शब्द नसला तरी प्रेमासाठी त्यांनी अनेक शब्द निर्माण केले. निष्ठावान प्रेमासाठी फिलिया (Philia), उत्कट प्रेमासाठी एरोस (Eros) असे शब्द वापरले जात असत.
किसमुळे ताण-तणाव कमी होतो!
वैज्ञानिकांच्या मते किसमुळे तुमचं केवळ हृद्य नव्हे तर डोकं देखील शांत होण्यास मदत होते. रोजचा ताण-तणाव कमी होण्यासही किस उपयुक्त ठरते. किसिंगमुळे मेंदूमध्ये केमिकल रिअॅक्शन होते. यादरम्यान हार्मोन्सला चालना मिळते. याला लव हार्मोन देखील म्हणतात. या हार्मोनमुळे जवळीक आणि प्रेमाची भावना वाढते.
वेगवेगळ्या पद्धतीने द्या शुभेच्छा
खास ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, एच. डी. वॉल पेपर शेअर करूनही आजचा हा दिवस स्पेशल होऊ शकतो. कस्टमाइज्ड गिफ्ट्स, व्हिडिओ, जिफस हे सुद्धा या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत!