International Men’s Day 2022: १९ नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला करतो. पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. याला युनेस्कोनेही पाठिंबा दिला आहे. असे असले तरीही ज्यापद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो, तितके महत्त्व या दिवसाला दिल्याचे पाहायला मिळत नाही. यावरून अनेकदा सोशल मीडियात मीम्सही व्हायरल होतात मात्र तितकंसं महत्त्व या दिवसाला मिळत नाही. याचे एक कारण म्हणजे बहुतांश वेळा सामान्य पुरुषाचे कर्तृत्व समाजासमोर येत नाही.
मागील कित्येक वर्षात चित्रपट व मुख्यतः जाहिरातींमधून पुरुष हा एकतर अत्यंत गरीब किंवा दया येईल असा किंवा अत्यंत श्रीमंत, यशस्वी, पार्टी करणारा, बिझनेसमध्ये गुंतलेला, घरच्यांकडे लक्ष न देणारा असा समोर आला होता. यात कुठेतरी सामान्य पुरुषाकडे दुर्लक्षच होत होतं. सुदैवाने ट्रेंडनुसार या संकल्पनाही काहीश्या बदललेल्या दिसत आहेत, तुम्ही नीट पाहिलंत तर मागील काही दिवसात व्हायरल झालेल्या अनेक जाहिराती व चित्रपटांमध्ये पुरुषांच्या भूमिका बदललेल्या दिसत आहेत. घर सांभाळणारा, बायकोला मदत करणारा पुरुष आता समाजासमोर येऊ लागला आहे आणि मुख्य म्हणजे गौरवला जाऊ लागला आहे.
यापूर्वी पुरुषांच्या वस्तूंच्या जाहिराती ज्या केवळ स्त्रीला आकर्षित करण्याच्या हेतूने दाखवल्या जात होत्या त्या आता स्वतःच्या काळजीसाठी का महत्त्वाच्या आहेत अशा पद्धतीने प्रदर्शित केल्या जात आहेत. या सकारात्मक बदलाचे काही नमुने आज आपण पाहणार आहोत.
Ariel जाहिरात
ये औरत मर्द वाली बात नहीं है, बात है सफाई की!
AU Small Finance Bank जाहिरात
आमिर खान व किंआराची ही जाहिरात प्रचंड चर्चेत व वादातही आली होती,मात्र यातील ‘बदल आपल्यापासून सुरु होतो” हे वाक्य व हि विचारसरणी नक्कीच विचारात घेण्यासारखी आहे.
Gillette जाहिरात
‘द बेस्ट अ मॅन कॅन गेट’ ही टॅगलाईन बदलून जिलेटने ‘द बेस्ट अ मॅन कॅन बी’ अशी केली होती, जी पुरुषांकडे बघण्याच्या संपूर्ण दृष्टिकोनाला बदलण्यात मदत करते.
Vim जाहिरात
शिवानी रांगोळेची ही जाहिरात सुद्धा चांगलीच चर्चेत होती, घरात समसमान कामाची वाटणी करण्याच्या नियमाला अधोरेखित करणारी आणि मुख्यतः तो नियम स्वीकारणाऱ्या पुरुषाला दाखवणारी ही जाहिरातीचे कौतुक झाले होते.
आजवर अनेक वर्ष पुरुषांना स्त्रीवर अत्याचार करणारे म्हणून हिणवण्यात आले आहेत, अलीकडची उदाहरणे पाहता त्या दाव्याला अतिशयोक्त्तीही म्हणता येणार नाही. पण सगळे पुरुष सारखे नसतात, स्त्री पुरुष असा भेदभाव न करणाऱ्या, आपल्यासह आपल्यांनाही पुढे घेऊन जाणाऱ्या, सर्व प्रेमळ मित्र, भाऊ, बाबा, नवरा, सासरा आणि असंख्य नात्यांना पुरुष दिनाच्या शुभेच्छा!