Dry Fruit Jewellery : लग्नासारख्या विशेष प्रसंगी, बरेच लोक सुंदर दिण्यासाठी मेकओव्हर करतात. सुंदर दागिने परिधान करतात. महिलांचा श्रृंगार दागिन्यांशिवाय कसा पूर्ण होईल. सहसा महिला, सोने, चांदी, हिऱ्यांचे सुंदर दागिने वापरतात. याशिवाय फुलांचे दागिने तीळाचे दागिणे, शंख शिंपल्याचे दागिने देखील तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही कधी काजू-बदाम-पिस्त्यापासन बनवलेले दागिने पाहिले आहेत का? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक हा व्हिडीओ पाहा. एका महिलेने चक्क ड्राय फ्रुटचे दागिने परिधान केले आहे. महिलेने डोहाळ जेवणासाठी हटके लूक केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची सर्वत्र चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर @vasudhaa_makeover पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता महिलेने परिधान केलेले सर्व दागिने ड्राय फ्रुट्स पासून तयार केलेले आहेत. गळ्यात हार, बांगड्या, कानातले, हेअरबँड, बेल्ट आणि केसांत माळलेले दागिने सर्व ड्रायफ्रुट्स पासून बनवलेले आहेत बदाम, काजू, पिस्ता, हिरवी वेलची इत्यादींनी सजवण्यात आले आहेत.

हेही वाचा – Fact Check : लाठीचार्जचा व्हायरल व्हिडिओ उत्तराखंडमधील हलद्वानीचा नव्हे तर मुंबईतील घाटकोपरचा! जाणून घ्या काय आहे सत्य?

गर्भवती महिलांसाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात महिलांना बदाम, काजू, पिस्ते असा सुका मेवा आवर्जून खाण्यास दिला जातो. याच थीमवर आधारित महिलेने तिचे डोहाळ जेवणाचे फोटो शूट केले आहे. डोहाळ जेवणाच्या वेळी महिलांना सहसा फुलांचे दागिने वापरतात पण या महिलेने आई आणि बाळासाठी पौष्टिक आहार म्हणून वापरल्या जाणाऱ्या ड्रायफ्रुटचे दागिणे परिधान केले आहेत. लोकांना ही कल्पना फार आवडली आहे. अनेकांना ड्राय फ्रुट्सचे दागिने पाहून कौतूक वाटत आहे.

इंस्टाग्राम रीलला आतापर्यंत ११ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंटमध्ये काही जणांनी “ड्राय फ्रूट ज्वेलरी” घालण्याच्या कल्पनेबद्दल नापसंती व्यक्त केली. अनेकांनी अन्न वाया घालवण्याबाबत टीका केली आहे. लोकांनी केलेल्या काही कमेंट्स खाली दिल्या आहेत.

हेही वाचा – जेव्हा शिल्पा शेट्टी जात्यावर गहू दळते तेव्हा…; नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना Video शेअर करत म्हणाले, “…वाह जी वाह!”

“लोक अजूनही अन्नाची नासाडी करून उत्सव का साजरे करत आहेत?”

“अन्नाची नासाडी…… कृपया हे थांबवा…….”

“आजकाल ड्रायफ्रुट्स सोन्याइतके महाग आहेत”

“नवीन ट्रेंड: ड्रायफ्रुट्स ज्वेलरी.”

“खूप श्रीमंत लोक.”

“फक्त माझ्या मित्रासारख्या खाद्यप्रेमींना ते आवडेल.”

हे चांगले आहे, जर तुम्हाला भूक लागली असेल तर तोडा आणि खा”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internet finds womans viral dry fruit jewellery nettizens troll her for wasting food snk
Show comments