स्वादिष्ट चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी आपण अनेकजण हिवाळा सुरू होण्याची वाट पाहत नाही का? गूळ-शेंगदाणे असो, तिळाची असो किंवा ड्रायफ्रूटची चिक्की असो, थंडीच्या ऋतुमध्ये खरोखरच सर्वांचा आवडता आणि पोष्टिक असा पदार्थ आहे. चिक्कीची नाव घेतलं तरी तिची गोड चव आठवते. पण तुम्हाला हे ऐकून फार वाईट वाटेल की आजकाल चिक्की सुद्धी विचित्र खाद्यपदार्थांच्या प्रयोगाला बळी पडत आहे. तुम्हाला चिक्की खायला आवडते का? मग हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचा राग अनावर होऊ शकतो कारण सर्वांच्या आवडत्या चिक्कीचा असा पदार्था होऊ शकतो याची कल्पनाही कोणी केली नसेल.

सोशल मीडियावर दरदिवशी विचित्र खाद्यप्रयोग व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील एक खाद्यपदार्थ विक्रेता चिक्की चाट बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. डिश हे मुळात पापडी चाट आणि चिक्कीचे मिश्रण करून तयार केला आहे. ज्यामध्ये विक्रेता पापडीच्या जागी गूळ आणि शेंगदाणा चिक्की वापरताना दिसत आहे. व्हिडिओचे कॅप्शन पाहून तो गुजरातमधील सुरतमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा –‘घरघंटी किणकिणती घंटा…सांताक्लॉज आला…”; मराठी ‘जिंगल बेल’ गाणं ऐकलं का? नाही मग ‘हा’ व्हिडीओ बघाच!

व्हिडिओची सुरुवात विक्रेत्याने चिक्कीचे दोन तुकडे केल्याचे दिसते. या चिक्कीवर आलू भुजिया टाकतो. पुढे जे घडते ते कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो. कारण विक्रेता गोड चिक्कीवर चक्क मसालेदार हिरवी चटणी आणि लिंबाच्या रस टाकतो.. पुन्हा एकदा भुजिय टाकतो आणि चिरलेली कोथिंबीर घालतो. त्यानंतर तो त्यात गोड चटणी घालतो. एका ग्राहकाला खायला देतो. चिक्कीवर करण्यात आलेला प्रयोग पाहून अनेक चिक्की प्रेमींचा राग अनावर होत आहे.

हे सांगण्याची गरज नाही की हा खाद्यप्रयोग नेटकऱ्यांना आवडला नाही. अनेकांना कमेंट करत आपला राग व्यक्त केला. अनेकांनी असा दावा केला आहे की, असे व्हिडिओ इतरांना आणखी विचित्र खाद्य प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

एकाने सांगितले की, “भाऊ कोणीतरी काही दिवसात लोणच्यासह रसमलाई विकण्यास सुरुवात करेल.” दुसर्‍याने गंमतीने म्हटले की, “आपण सर्वात वाईट युगाकडे जात आहोत… हे फार्मा कंपन्यांना पोटाशी संबंधित आरोग्य समस्यांवर काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल.”

हेही वाचा – घरातील मोकळे टेरेस वापरा अन् कमवा लाखो रुपये! व्यवसायाच्या ‘या’ ४ सोप्या ट्रिक्स ऐकून सोडून द्याल १०-२० हजारांची नोकरी

तिसऱ्याने लिहिले, “किती छान रेसिपी आहे… कृपया आता ही रेसिपी नष्ट करा.” काहींनी लोकांना खाद्यपदार्थांवर प्रयोग करणे थांबवण्याचे आवाहन केले. “तुम्ही लोक जेवणावर कसले फालतू प्रयोग करत आहात, कृपया अशा गोष्टी करणे थांबवा,” असे एकाने लिहिले.

दुसर्‍याने लिहिले, “पुदिना चटणी वापरल्यानंतर मला ते पाहवले नाही. पृथ्वीवर लोकांना विचित्र कल्पना कशा येतात?”

एकाने मजेत म्हटले की, “मी चीज आणि मेयोनेझची टाकण्याची वाट पाहत होतो. आणखी एक जण म्हणाला, “कोणीतरी या चिक्कीला न्याय मिळवून द्या”