पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडीओ ‘द टेलिग्राफ’ने जारी केला आहे. येथील वेस्ट एंड येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये नीरव मोदी वास्तव्य आहे. ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदीने लंडनमध्ये हिऱ्यांचा नवा व्यवसाय सुरु केला आहे.

नीरव मोदीला आम्ही शोधले असून तो वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचेही ‘द टेलिग्राफ’ने म्हटले आहे. नीरव मोदीचा व्हिडीओही यासोबत जारी करण्यात आला असून अत्यंत बिनधास्तपणे लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.

‘द टेलिग्राफ’ जारी केलेल्या जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडीओत पत्रकार वारंवार नीरव मोदीला प्रश्न विचारत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारणा करत आहे. मात्र नीरव मोदी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. दरवेळी नीरव मोदी ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतीक्रिया देताना या व्हिडीओत दिसत आहे. अनेक प्रश्नांना एकच उत्तर देणाऱ्या नीरव मोदीच्या या ‘नो कमेंट्स’ उत्तरावरुन आता इंटरनेटवर मिम्सची लाट आली आहे. पाहुयात याच सिरीजमधील काही व्हायरल झालेले मिम्स

१०

११

१२

या व्हिडीओत नीरव मोदीने एक जॅकेट घातलेलं दिसत आहे. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा हजार पाऊंड म्हणजेत नऊ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader