भारतात देणगीदारांची कमतरता नाही, इतरांना मदत करणे हा त्यामागचा उद्देश असतो. एका अहवालानुसार, देशात दरवर्षी ३४,००० कोटींहून अधिक रक्कम देणगीसाठी जाते. असे असतानाही देशातील गरिबीचा आकडा मोठा आहे आणि भीक मागून जगणाऱ्यांची कमतरता नाही. कधी ना कधी, आपण सर्वांनी पैसे दान करण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्याच्या कडेला किंवा बाजारातील भिकाऱ्यांना पैसे दिले जातात हे आपण नेहमी पाहतो. पण त्या भिकाऱ्यांचे जीवन बदलले आहे का? आता, एका सामाजिक कार्यकर्त्यांने यासाठी प्रयत्न केला आहे. या व्यक्तीने भिकाऱ्यांना उद्योजक करण्याचा उपक्रम सुरू केला असून हे काम करण्यासाठी बेगर्स कॉर्परेशनची स्थापना केली आहे. २०२१ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भिकारी उद्योजक करण्याचे काम हाती घेतले आहे.

उद्योजक होत आहेत भिकारी

बेगर्स कॉर्परेशनचे संस्थापक चंद्रा मिश्रा आहेत, जे दोन दशकांहून अधिक काळ सामाजिक कार्य करत आहे. जीएनटीटीव्हीसोबत साधलेल्या संवादात, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, लोकांनी देणगी देऊनही भीक मागणे कमी होत नाही, त्याचे कारण काय आहे? तेव्हा याला उत्तर देताना ते म्हणाले की, आपल्या देशात दान करण्याच्या सवयीने काहीही चांगले होत नाही. आम्ही केवळ दान करण्यावरवर लक्ष केंद्रित केले, तर समस्येचे निराकरण रोजगारामध्ये आहे. रोजगाराच्या माध्यमातूनच लोक योग्य आणि सन्मानाचे जीवन जगू शकतात.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
syntel founder Bharat Desai Success Story from leaving ratan tata company to start his own business which he sold for crores
व्यवसाय सुरू करण्यासाठी सोडली रतन टाटांची कंपनी, नंतर तोच व्यवसाय २८,००० कोटींना विकला, जाणून घ्या भरत देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
article on Trade industry industry group Check for changing rules Bank loans
लेख: भयमुक्त व्यापारउद्याोग करण्याची संधी…

हेही वाचा : आहा…काय सुंदर आवाज आहे! दिल्ली पोलिसांनं हुबेहुब अरिजित सिंगच्या सुरात गायलं ‘आबाद बरबाद’ गाणं

‘दान नको, गुंतवणूक करा’चा नारा दिला

चंद्रा मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, बेगर्स कॉर्पोरेशन सुरू करताना त्यांनी दान नको, गुंतवणूक करा असा नारा दिला आणि भिकाऱ्यांना उद्योजक करण्याची मोहीम सुरू केली. मूळचे ओडिशाचे असलेले चंद्र मिश्रा गेल्या अनेक वर्षांपासून रोजगाराच्या प्रश्नावर काम करत आहेत. भिकाऱ्यांचे जीवन बदलण्यासाठी पुढाकार घेणारे मिश्रा म्हणाले की, मी गुजरातमध्ये असताना भिकाऱ्यांसोबत काम करण्याचा विचार पहिल्यांदा केला.

गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादजवळ एक सरकारी कौशल्य-प्रोत्साहन केंद्र असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येथे लोकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. मात्र याच केंद्राजवळ बांधलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या आवारात अनेक भिकारी बसतात. तेव्हा त्यांना वाटले की, या लोकांना पैसे देण्याऐवजी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार सुरू करण्यास मदत केली पाहिजे.

चंद्र मिश्रा म्हणाले की, हे काम सुरू करण्यासाठी संपूर्ण देशाचे सर्वेक्षण करणे कठीण होते, म्हणून मी पंतप्रधान मोदींच्या विधानसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बेगर्स कॉर्पोरेशनच्या संस्थापकाने फेसबुकच्या माध्यमातून गुगल फॉर्म शेअर केला आणि त्याला २० हजारांहून अधिक लोकांचा प्रतिसाद मिळाला. त्यांच्यामध्ये विद्यार्थी, लघु उद्योजक (ज्यांची कामे कोरोनाच्या काळात थांबली होती) किंवा ज्या लोकांची नोकरी गेली होती. वाराणसीमध्ये घाटापासून मंदिरापर्यंत भिकाऱ्यांची कमतरता नसल्याचे मिश्रा यांनी पाहिले.

२०२१ मध्ये या मोहिमेला आला वेग

यानंतर भिकारी महामंडळाने आपली पावले पुढे टाकत या भिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. २०२१मध्ये जेव्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा अनेक भिकारी मदतीसाठी त्यांच्याकडे आले. ऑगस्ट २०२१ मध्ये एका महिलेने त्याच्यासोबत काम करायला सुरुवात केली. पतीने तिला घरातून हाकलून दिल्याने ही महिला मुलासह घाटावर भीक मागायची. आणि त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा नव्हती. मिश्रा यांनी सांगितले की, त्यांनी महिलेला समजावून सांगितले की, ती एका स्थिर नोकरीवर रुजू होऊन तिच्या मुलाला चांगले जीवन देऊ शकते. त्याने महिलेला पिशव्या करण्याचे प्रशिक्षण दिले आणि नंतर तिला काम दिले.

हेही वाचा : श्रीलंकेत विकसित होणार रामायणाच्या खुणा! प्रवाशांना भारतीय रुपये वापरण्याची दिली जाऊ शकते परवानगी

१४ भिकारी कुटुंबांचे जीवन बदलले

आज चंद्र मिश्रा यांनी१४ भिकारी कुटुंबांना उद्योजक केले आहे. त्यांच्यासोबत १२ कुटुंबे पिशव्या इत्यादी करविण्याचे काम करत आहेत तर दोन कुटुंबांनी मंदिराजवळ पूजा साहित्य, फुले आदींची दुकाने सुरू केली आहेत. हे सर्व लोक आज पूर्ण सन्मानाने चांगली उपजीविका करत आहेत आणि चांगले जीवन जगत आहेत.

भिकाऱ्यांना दिले कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार

मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जुलै २०२२ मध्ये एक मोहीम सुरू केली आणि लोकांना प्रत्येकी फक्त १०,००० रुपये गुंतवण्यास सांगितले जेणेकरून भिकाऱ्यांचे जीवन बदलू शकेल. या मोहिमेअंतर्गत ५७जणांनी त्यांना दान केले. या रकमेतून त्यांनी भिकाऱ्यांचे कौशल्य प्रशिक्षण आणि नंतर रोजगार उभारणीसाठी मदत केली. तसेच, त्याने आपल्या कंपनीची नोंदणी केली आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स स्पर्धेत भाग घेतला.

चंद्र मिश्रा यांच्या मते, आपल्या देशात सुमारे पाच लाख भिकारी आहेत, त्यापैकी बहुतेक पश्चिम बंगाल आणि नंतर उत्तर प्रदेशात आहेत. त्यांच्या मते हा डेटा सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदवला जातो. दुसरीकडे, भारत परोपकार अहवाल २०२२(India Philanthropy Report ) नुसार, आपल्या देशातील फक्त सामान्य माणूस दरवर्षी २८ हजार कोटी दानधर्मासाठी देतो.

प्रत्येक भिकाऱ्यामागे हवे दीड लाख रुपये !

चंद्र मिश्रा सांगतात की, ”त्यांचे मॉडेल अगदी स्पष्ट आहे. त्यांना प्रत्येक भिकाऱ्यामागे फक्त दीड लाख रुपये हवे आहेत. या दीड लाख रुपयांपैकी ५०हजार रुपये त्या भिकाऱ्याला तीन महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्याचे स्थलांतर करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. उर्वरित एक लाख रुपये त्या भिकाऱ्याला त्याचा रोजगार सुरू करण्यासाठी देण्यात येणार आहेत. ”