Viral News Today: एका चुकीमुळे कधी कोणाचे कोटींचे नुकसान झाल्याच्या अनेक बातम्या पण ऐकून वाचून असाल पण अहमदाबादमधील एक नुकताच घडलेला प्रसंग एका व्यक्तीसाठी आयुष्यभराची आठवण ठरला आहे. बँकेच्या एका घोळामुळे त्याला मोजताह येणार नाहीत इतके शून्य असणारी रक्कम अचानक बँक खात्यात प्राप्त झाली. अहमदाबाद मधील हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहे. नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊयात..

तर झालं असं की, रमेश सागर नामक एका व्यक्तीला त्याच्या डिमॅट खात्यात अचानक ११, ६७७ कोटी रुपये जमा झाल्याचा मॅसेज आला. अर्थात एवढी रक्कम पाहून आपल्याप्रमाणे त्यांनाही धक्काच बसला नाही. एकीकडे आश्चर्य व दुसरीकडे कमाल आनंद यामुळे काय करावे हे रमेश यांना सुचत नव्हते असे ते सांगतात. मागील पाच- सहा वर्षांपासून रमेश शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी कोटक सिक्युरिटीजमध्ये डिमॅट खाते उघडले.

Viral Video: बदल्याची आग! भरदिवसा पेटवली मालकाची महाग मर्सिडीज कार; कारण वाचून ठरवा दोषी कोण?

एका महिन्यापूर्वी, रमेश यांना खात्यात ११६,७७, २४, ४३, २७७. १० कोटी रुपये आले. आठ तासांहून अधिक काळ त्यांच्या खात्यात पैसे होते. ही रक्कम पाहून उडालेला गोंधळ थोडा कमी होताच सावरून लगेचच रमेश यांनी पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. त्यातील दोन कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवताच त्यांना काही वेळात पाच लाखाचा नफा झाला.

हे सर्व काही फार काळ टिकले नाही कारण रमेश यांच्या माहितीनुसार संध्याकाळी ८ ते ८. ३० च्या सुमारास बँकेने रक्कम काढून घेतली. बँकेकडून प्राप्त झालेल्या निवेदनात अॅपमध्ये मार्जिन अपडेट समस्या असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ रमेशचा नाही तर अन्यही अनेक डीमॅट खातेधारकांना यादिवशी असा मोठा लाभ झाला होता.

IANS ने पश्चिम विभागीय कार्यालय (मुंबई) कडून या समस्येवर कोटक सिक्युरिटीजची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा, अधिकाऱ्यांनी सांगितले की गुंतवणूकदाराचे पॅन कार्ड किंवा डिमॅट खाते क्रमांक दाव्याची पडताळणी करू शकत नाही.

Story img Loader