iPhone Cost In Pakistan: जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अ‍ॅप्पलने १३ सप्टेंबर रोजी iPhone 15 सीरिज लाँच केली. त्यात चार मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात अ‍ॅप्पल iPhone 15 ची प्री-बुकिंग १५ सप्टेंबरपासून सुरू झाली असून दरम्यान iPhone 15 हा २२ सप्टेंबरपासून विक्रीसाठी स्टोअरमध्ये उपलब्ध झाला आहे.  iPhone 15 च्या १२८GB मॉडेल, ४८ MP लेन्स, A16 Vionic chip आणि iOS 17 सह बनवलेले आहे, त्याची किंमत भारतात ७९,९०० रुपये आहे. तर iPhone 15 Plus 128GB मॉडेलची किंमत ८९,९०० रुपयांपासून सुरू होते. पण आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये या फोनची किंमत किती तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? खरं तर, पाकिस्तानमध्ये आयफोन 15 मालिकेची किंमत इतकी जास्त आहे की सोशल मीडिया वापरकर्त्यांना किमती वाचून धक्काच बसला आहे. यामुळे काही वापरकर्त्यांनी मायक्रोब्लॉगिंग साइटचा आनंदही घेतला.

काय झालं नेमकं

२० सप्टेंबर रोजी @pallavipandeyy नावाच्या युजरने मायक्रोब्लॉगिंग साइटवर लिहिले, पाकिस्तानात iPhone 15 ची किंमत तब्बल ७ लाखांच्या वर आहे. यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर लोकप्रिय झाली, ज्याला आतापर्यंत ३ लाख ६३ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक युजर्सनी कमेंट केली. जसे एका व्यक्तीने लिहिले, “भारतातून खरेदी करा आणि नंतर पाकिस्तानमध्ये विक्री करा.” दुसऱ्याने सांगितले की, “या किमतीत उत्तरप्रदेशात प्लॉट खरेदी करता येईल.” त्याचप्रमाणे इतर वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

journey of India’s engagement with the Taliban
तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Image Of Tim Cook Apple CEO
Apple CEO Salary : टिम कूक यांच्या पगारात घसघशीत वाढ, २०२४ मध्ये अ‍ॅपल कंपनीकडून मिळाले ६४३ कोटी रुपये
Boyfriend commits burglary to impress girlfriend with expensive iPhone gift
नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते! अल्पवयीन प्रेयसीचा आयफोनसाठी हट्ट; प्रियकराने…
Kalyan elder brother killed younger brother dispute
कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून
Soyabean Purchase Objective Failed farmers in trouble
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?
1.5 lakh Pakistan government jobs
एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?

(हे ही वाचा : पहिल्यांदाच ‘इतक्या’ स्वस्तात मिळताहेत Apple iPhones, खरेदीसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा! )

किडनी विकूनही गरीबांना मिळणार नाही…

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची गोष्टच वेगळी आहे

खरंतर पाकिस्तान आणि भारताच्या चलनात फरक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये iPhone 15 ची किंमत ३,६६,७०८ रुपयांपासून सुरू होते. सर्वात महाग iPhone 15 Pro Max with 512 GB आहे ज्याची किंमत ५,९९,५९३ रुपये आहे, ज्याची किंमत भारतात तुम्हाला १,७९,९०० असेल. सोशल मीडियावर यावर अनेक विनोद केले जाऊ लागले. एका यूजरने लिहिले, “किडनी विकूनही आयफोन येणार नाही.” पण पाकिस्तानचे चलन भारतीय चलनापेक्षा वेगळे आहे. १ पाकिस्तानी रुपया ०.२९ भारतीय रुपयांच्या बरोबरीचा आहे. म्हणजे, पाकिस्तानमध्ये ५,९९,५९३ रुपये भारतात १,७२,१७७ रुपये आहेत, ज्यामुळे हे स्पष्ट होते की, भारत आणि पाकिस्तानमधील iPhone 15 च्या किंमतीत फारसा फरक नाही.

Story img Loader