iPhone Cost In Pakistan: जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अॅप्पलने १३ सप्टेंबर रोजी iPhone 15 सीरिज लाँच केली. त्यात चार मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात अॅप्पल iPhone 15 ची प्री-बुकिंग १५ सप्टेंबरपासून सुरू झाली असून दरम्यान iPhone 15 हा २२ सप्टेंबरपासून विक्रीसाठी स्टोअरमध्ये उपलब्ध झाला आहे. iPhone 15 च्या १२८GB मॉडेल, ४८ MP लेन्स, A16 Vionic chip आणि iOS 17 सह बनवलेले आहे, त्याची किंमत भारतात ७९,९०० रुपये आहे. तर iPhone 15 Plus 128GB मॉडेलची किंमत ८९,९०० रुपयांपासून सुरू होते. पण आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये या फोनची किंमत किती तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? खरं तर, पाकिस्तानमध्ये आयफोन 15 मालिकेची किंमत इतकी जास्त आहे की सोशल मीडिया वापरकर्त्यांना किमती वाचून धक्काच बसला आहे. यामुळे काही वापरकर्त्यांनी मायक्रोब्लॉगिंग साइटचा आनंदही घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा