शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत एका धावाने सामन्यात बाजी मारली. आयपीएलमधलं मुंबईचं हे चौथ विजेतेपद ठरलं. पहिल्या तीन षटकांत खोऱ्याने धावा देणाऱ्या मलिंगाने अखेरच्या षटकात आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरचा बळी घेतल्यानंतर, सर्व मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मैदानात येत जल्लोष केला. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. आपल्या कल्पकबुद्धीला चालना देत नेटकऱ्यांनी या विजयानंतर भन्नाट मीम्स तयार केले आणि सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे मलिंगावरही बरेच गमतीशीर मीम्स पाहायला मिळाले. सोशल मीडियावरील हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

https://twitter.com/sarkazmikpage/status/1127636756021399552

https://twitter.com/NikammeP/status/1127637472026828806

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली. याआधी २०१७ साली झालेल्या अंतिम फेरीतही मुंबईने पुण्यावर एका धावेने मात केली होती. रोहित शर्माचं कर्णधार म्हणून हे चौथं विजेतेपद ठरलं. तर मलिंगा शेवटच्या षटकामुळे आणि प्रामुख्याने शेवटच्या चेंडूमुळे हिरो ठरला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 final mi vs csk funniest memes after the match