Hardik Pandya Krunal Pandya was seen singing bhajans : आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू असलेला त्याचा भाऊ कृणाल पांड्या सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पण, या चर्चेमागचे कारण क्रिकेट नसून दुसरेच आहे. सोशल मीडियावर सध्या पांड्या ब्रदर्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोघे भाऊ भक्तिभावाने चक्क भजन गाताना दिसतायत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून युजर्सही भन्नाट कमेंट्स करीत आहेत.

हा व्हिडीओ पांड्या ब्रदर्सच्या घरातील आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्या घरी एका पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. यावेळी एका भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, आधी हार्दिक पांड्या एकटा भजन गात नाचताना दिसतोय. त्यानंतर काही वेळाने त्याचा भाऊ कृणाल पांड्याही त्याच्याबरोबर आला आणि दोघेही अगदी आनंदात ‘हरे कृष्ण हरे राम’ असे गाताना दिसत आहेत. यावेळी दोघांनीही अगदी पारंपरिक कुर्ता-पायजमा घातलेला दिसत आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स

पाहा पांड्या ब्रदर्सनी शेअर केलेला व्हिडीओ

या व्हिडीओवर आता युजर्सही चांगल्या कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, भावा तुझ्याबद्दलचा आदर वाढला आहे. ही देवाची शक्ती आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, पांड्या बंधूंचा आदर! तिसऱ्या युजरने म्हटले की, तुला असे पाहून मला आनंद झाला. तुम्ही प्लीज नेहमी असेच आनंदी राहा. अशा प्रकारे चाहते पांड्या ब्रदर्सवर प्रेमाचा वर्षाव करीत आहेत.

VIDEO: ऑफिसमध्ये इमर्जन्सी सांगून गेली IPL मॅच पाहायला; बॉसने तिला टीव्हीवर LIVE पाहिले, मग पुढे घडले असे की…

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्या गुजरातमधील सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी हार्दिक पांड्याचा सोमनाथ मंदिरात पूजा करतानाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता हा दुसरा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये हार्दिक भजन गाताना दिसत आहे. हार्दिक पांड्याचा सोमनाथ मंदिरात पूजा करतानाचा व्हिडीओ श्री सोमनाथ मंदिराने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आहे.

Story img Loader