Indian Premier League 2024 Quiz : केवळ भारतातच नाही, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये सध्या आयपीएलची क्रेझ पाहायला मिळतेय. यंदा आयपीएलचा १७ वा ‘रन’संग्राम सुरु असून तो दिवसेंदिवस अधिक रंगताना दिसतोय. क्रिकेटप्रेमी आयपीएलचा मनसोक्त आनंद घेताना दिसतायत. चौकार, षटकारांनंतरचा कल्ला अन् आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी चाहते मैदानांवर गर्दी करत आहेत. पण आयपीएल सामन्यांचा आनंद लुटत असताना त्यातील काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला माहिती असतात, तर काही गोष्टी नव्याने आपल्या कानावर पडतात किंवा आपण वाचतो. लोकसत्ता ऑनलाइन आयपीएल संबंधित अशात १० इंटरेस्टिंग गोष्टींचा समावेश असणारी ‘आयपीएल २०२४ क्विझ’ स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन आले आहे. या क्विझमधील १० प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्हाला घरबसल्या बक्षीसं जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

बक्षीस जिंकण्याची नामी संधी:

DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!

या क्विझमध्ये असणारे १० प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे ५ मिनिटांचा वेळ असेल. या ५ मिनिटांत जो कोणी कमी वेळात १० प्रश्नांची अचूक उत्तरं देईल त्याला बक्षीस मिळण्याची संधी असेल. तुम्ही हे क्विझ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. अगदी व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुकवरदेखील! चला तर मग, मंडळी वाट कसली बघताय? आज, आताच खेळायला सुरुवात करा आणि बक्षीस जिंका.

स्पर्धेच्या नियम आणि अटी –

१. ही स्पर्धा भारतातील सर्व वाचकांसाठी खुली असेल.
२. क्विझ स्पर्धेची अंतिम मुदत ३१ मे असून निकाल १० जून रोजी लोकसत्ता डॉट कॉमवर जाहीर केला जाईल.
३. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
४. १८ वर्षांवरील कुणीही व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकते.
५. क्विझ सबमिट करण्यासाठी लॉग- इन किंवा साईन- अप करणे आवश्यक आहे.
६. बक्षीसपात्र क्विझ ज्या स्पर्धकाच्या इ-मेल/ मोबाईल क्रमांकाद्वारे नोंद झाले आहे, त्याच्याशी इमेलद्वारे संपर्क साधण्यात येईल.
७. बक्षीस स्वीकारण्यासाठी (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्स यापैकी कोणतेही एक) ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
८. क्विझ सबमिट केल्यानंतर स्पर्धकांना कोणत्याही कारणाने सहभाग मागे घेण्यास अनुमती नाही.
९. बक्षीस अहस्तांतरणीय, अदलाबदल न करता येण्याजोगे आणि ना-परतावा आहे. बक्षिसाऐवजी रोख रक्कम दिली जाणार नाही. विजेत्यानेच बक्षीस स्वीकारायचे आहे.
१०. आयइ ऑनलाइन मीडिया सर्व्हिसेस (प्रा.) लिमिटेडचा कोणताही कर्मचारी अथवा त्याच्या कुटुंबीयांस या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
११. बक्षीस कूपन वितरित केल्यानंतर त्यासंदर्भात आयोजक कंपनीची कोणतीही जबाबदारी असणार नाही. कूपन—- मायंत्राचे असेल तर त्यांच्या नियम व अटी बक्षिसासाठी लागू असतील असेही यात समाविष्ट करावी, अशी लीगलची सूचना आहे. – महत्त्वाचे.
१२.. या स्पर्धेचे आयोजक (आयइ ऑनलाइन मीडिया सर्व्हिसेस (प्रा.) लिमिटेड) यांनी कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता सदर स्पर्धा आणि/ किंवा तिचे संबंधित नियम यात बदल करण्याचा, तसेच ही स्पर्धा तहकूब, रद्द किंवा सुधारित करणे, तसेच यात अन्य कोणत्याही प्रकारे भर घालणे/ वाढ करणे किंवा विभाजन करणे इत्यादीचे, तसेच बक्षिसामध्ये बदल करण्याचे आयोजकांचे अधिकार राखून ठेवले आहेत. स्पर्धेत व जागेवर प्रवेश देणे/ नाकारणे याचेही अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत.
१३. कमीत कमी वेळेस सर्व उत्तरे बरोबर असणारे क्विझ सबमिट करणाऱ्यास विजेता घोषित करण्यात येईल. एकाहून अधिक स्पर्धकांनी कमीत कमी वेळेस क्विझ सबमिट केलेले असल्यास त्याबरोबर सर्वोत्कृष्ट घोषवाक्य मी लोकसत्ता डॉटकॉम वाचतो कारण त्यास विजेता घोषित करण्यात येईल.
१४. विजेते ठरविणे यासाठी आयोजक (दी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइन मीडिया लिमिटेड) यांचे अंतर्गत परीक्षक मंडळ नियुक्त करेल. परीक्षकांचा व दी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइन मीडिया लिमिटेड यांचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील.
१५ स्पर्धेसंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आपण contact@loksatta.com या इमेल आयडीवर संपर्क साधू शकता. इमेलच्या सब्जेक्टमध्ये मात्र ‘क्विझ स्पर्धा’ असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
१६. स्पर्धा आयोजक विजेत्यांची नावं जाहीर करतील. बक्षिसाऐवजी कोणतीही रोख रक्कम किंवा मोबदला दिला जाणार नाही.
१७. आपण सबमिट केलेले क्विझ हाच आपला स्पर्धेतील सहभाग असेल. क्विझ संदर्भातील सर्व अधिकार आयोजक आयइओएमएसपीएल यांच्या अधीन असतील. आपला स्पर्धेतील सहभाग हाच अटी आणि शर्ती मान्य असल्याचे संमतीसूचक मानण्यात येईल.
१८. नियम आणि अटींचा स्पर्धक सहभागींकडून भंग झाला आहे असे निदर्शनास आल्यास लोकसत्ता डॉट कॉम आणि आयइओएमएसपीएल कडे बक्षिसासंदर्भातील सर्वाधिकार राहतील. ते बक्षीस गोठविण्याचा अधिकारही त्यात समाविष्ट आहे.
१९. मुंबईतील न्यायालयाच्या विशेष कार्यक्षेत्रातच याचा समावेश असेल.

Story img Loader