Auto rikshaw Drivers Will Give Offer RCB Fans : सध्या सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची (IPL 2025) क्रेझ बघायला मिळते आहे. या टुर्नामेंटमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स आदी अनेक टीम्स सहभागी झाल्या आहेत. तसेच आपल्यातील अनेकांची यातील एखादी तरी आवडती टीम आहे, जी आयपीएलची ट्रॉफी जिंकावी अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी आपण मॅच बघताना मित्रांशी भांडतो, अगदी आवडत्या खेळाडू किंवा टीमसाठी मुंबईत राहूनही मुंबई इंडियन्सला सपोर्ट न करता दुसऱ्या टीमला सपोर्ट करतो.

तर आज अशाच एका आयपीएल चाहत्याची पोस्ट व्हायरल होते आहे. तुम्ही आरसीबीचे कट्टर चाहते आहात का? जर हो, तर बंगळुरूचे दोन रिक्षाचालक तुमचे मन जिंकतील एवढे तर नक्की… या दोन्ही रिक्षा चालकांनी मिळून आयपीएल २०२५ चा अनुभव आणखी खास केला आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) व गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यात काल रोमांचक सामना झाला. या सामन्यापूर्वी परशुराम शट्टी (Parshuram Shatty ) व ‘ऑटोकन्नडिगा०७७९’ (Autokannadiga0779) हे दोन रिक्षाचालक काल मॅच बघायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी खास पोस्टर घेऊन उभे होते. एकदा बघाच हे खास पोस्टर…

पोस्ट नक्की बघा…

जर तुम्ही आरसीबीची जर्सी घातली असेल तर …

तर व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिले असेल की, आरसीबीची जर्सी घातलेल्या चाहत्यांना सामन्याच्या ठिकाणी नेण्याबाबतची मोफत प्रवासाची ऑफर रिक्षाचालकांनी दिली होती. ‘जर तुम्ही आरसीबीची जर्सी घातली असेल, तर मोफत राईड’ असे लिहिलेले मोठे पोस्टर हातात घेऊन हे दोन्ही रिक्षाचालक मोफत राईडची घोषणा करताना दिसले आहेत. बंगळुरू येथील या दोन्ही रिक्षाचालकांनी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टरमध्ये कन्नड आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत लिहिलेला मजकूर दिसत आहे, जो तुमच्या चेहऱ्यावरही आनंद देऊन जाईल.

सोशल मीडियावर ही पोस्ट @parshuram_shatty आणि @autokannadiga0779 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे, जे पाहून आरसीबी फॅन खुश झाले आणि त्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच काल बुधवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सच्या (RCB vs GT) सामन्यात शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने आरसीबीचा आठ विकेट्सनी पराभव करीत त्यांचा दुसरा मोठा विजय मिळविला.