‘Flames out of nowhere’ Scares England’s Tom Curran: बिग बॅश लीग 2023-24 च्या स्पर्धेत होबार्ट हरिकेन्स विरुद्धच्या अॅक्शन-पॅक मॅचमध्ये सिडनी सिक्सर्ससाठी इंग्लंडच्या टॉम कुरनला क्षेत्ररक्षणाची जबाबदारी सांभाळणं फारच कठीण गेलं. सर्वात कमी धावांचा झालेल्या या सामन्यात सिडनी सिक्सर्सने पहिल्या नऊ षटकांत होबार्ट हरिकेन्सला ६९-५ पर्यंत खाली आणले होते. यानंतर फलंदाजीची जबाबदारी खालच्या फळीतील सीजे अँडरसनवर होती.अँडरसनने डावाच्या १३व्या षटकात चौकार ठोकला तेव्हा लाँग-ऑफवर उभा असलेला कुरन फक्त बघतच राहिला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग, या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत होता आणि त्याने एका मजेशीर घटनेवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इंग्लंडचा स्टार टॉम करन सीमारेषेजवळ चेंडू पकडण्यासाठी पळत होता तेव्हाच अचानक कुरनच्या वाटेत अचानक आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. एका सेकंदासाठी टॉमसुद्धा घाबरून गेला आणि त्याने उडी मारली. अचानक घडलेला हा प्रकार पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये एकच हशा पिकला
दरम्यान, २७ चेंडूत १७ धावा करणाऱ्या अँडरसनला अखेर १७ व्या षटकात करननेच बाद केले होते. करनने चार षटके टाकली आणि १९ धावा दिल्या. होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील बीबीएल सामन्यात करनने जॅक्सन बर्ड, जॅक एडवर्ड्स आणि बेन द्वारशुइससह 8 बळी घेतले. सामन्याबद्दल अधिक सांगायचं तर, कॅलेब ज्युलने सिडनी सिक्सर्सविरुद्ध होबार्ट हरिकेन्ससाठी सर्वाधिक धावा केल्या. ज्वेलच्या २४ चेंडूत ४२ धावा आणि त्यानंतर ख्रिस जॉर्डन (१६) आणि पॅट्रिक डूली (१९) यांच्या कॅमिओने हरिकेन्सला २० षटकांत १३५ – ८ पर्यंत नेले.
Video: टॉम करन गेला चेंडू पकडायला तेवढ्यात..
हे ही वाचा<< मोहम्मद शमीच्या घराबाहेर लागली लोकांची रांग; कारण जाणून वाटेल अभिमान, आधी ‘हा’ Video पाहा
इंग्लंडचा अष्टपैलू करन BBL 11 नंतर प्रथमच सिक्सर्सच्या क्रमवारीत परतला आहे. याआधी फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला सीझनच्या अर्ध्यावर माघार घ्यावी लागली होती. २८ वर्षीय खेळाडू इंग्लंडकडून २ कसोटी, २८ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि ३० T20 सामने खेळला आहे.तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडूनही करन खेळला आहे.