Funny Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. पण, अनेक व्हिडीओ व्हायरल होत असले तरी त्यातील काहीच व्हिडीओ तुमचे लक्ष वेधून घेतात. अशाच रंजक रील्स व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघत राहता. सध्या सोशल मीडियावर वृंदावनमधील एका आयपीएसचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो आयपीएस असं काही म्हणतोय की ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पोलिसांची वर्दी घालून बसला आहे, ज्याला व्हिडीओ बनवणारी व्यक्ती विचारते की, तुम्ही पोलिसांची वर्दी घालून का फिरत आहात? तुम्ही वर्दीवर तीन स्टार पेनने का रेखाटले आहेत? ज्यावर ती व्यक्ती उत्तर देते की, होय, माझ्याकडे मार्कर आहे आणि मी आयपीएस आहे. माझे नाव इच्छा पूरण श्रीवास्तव आहे, इच्छाचा आय, पूरणचा पी आणि श्रीवास्तवचा एस. यामुळेच मी आयपीएस आहे.

स्वत:ला म्हणवतो वकील

व्हिडीओ बनवणारी व्यक्ती पुढे विचारते की, तुमच्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत की तुम्ही खोटे बोलत आहात, तेव्हा आयपीएस उत्तर देतो की – आय एम लॉयर, ज्यावर त्याला सांगितले जाते की, लॉयर नाही लायर असतं ते. तो पुन्हा अतिशय मनोरंजक पद्धतीने उत्तर देतो आणि वकिलाचे इंग्रजी स्पेलिंग समजावून सांगत म्हणतो की, होय, मी लायर आहे.

शेवटी तो कबूल करतो की, होय मी खोटे बोलतो. किती टक्के विचारले? यावर तो म्हणतो की, तो फक्त पाच टक्के खरं बोलतो, बाकी खोटे बोलतो. यावर तो स्वतःच हसतो आणि सांगतो की, मी ९५ टक्के खोटे बोलतो. अतिशय मनोरंजक आणि अनोख्या शैलीने तो उत्तर देतोय, ते ऐकून कोणालाही त्याचे बोलणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल.

हा मनोरंजक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @yayin_shukla नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये लिहिलेय की, मी फक्त ९५ टक्के खोटे बोलतो. त्याला वृंदावनात भेटा, तो खूप मस्त माणूस आहे. वेळ कधी जाईल समजणार नाही. तर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी खूप खोटे बोलू शकतो. या व्हिडीओवरही अनेक जण मजेशीर कमेंटस करत आहेत.

Story img Loader