Viral Video: लहान मुलं मोठ्यांचे अनुकरण करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्यामुळे लहान मुलांसमोर कोणतीही गोष्टी करताना विचार करून करावी लागते आणि त्यांना या वयात कोणत्या गोष्टी करू नये हे सुद्धा वारंवार समजावून सांगावे लागते. तरी देखील काही मुलं अशी असतात जी स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता, मोठ्यांचे अनुकरण करून स्वतःवर संकट ओढून घेतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीस पाहायला मिळालं आहे. दोन लहान मुलं विनाहेल्मेट मोटारसायकल घेऊन प्रवास करताना दिसले आहेत.
दोन चिमुकल्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन मुले विनाहेल्मेट व कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय मोटारसायकल चालवताना दिसत आहेत. तसेच त्यांची देखरेख करण्यासाठी त्यांचे पालक किंवा कोणती अनुभवी व्यक्ती सुद्धा तेथे उपस्थित नाही आहे. सुरवातीला एक तरुण मोटारसायकलवर बसतो त्यानंतर दुसऱ्या मुलालाही त्याच्या मागे बसण्यास सांगतो आणि दोघेही मोटारसायकल घेऊन निघून जातात. एकदा बघाच हा व्हिडीओ.
हेही वाचा…VIDEO: व्यक्तीने दुचाकीवरून नेलं असं भलंमोठं कपाट; एका हाताने धरलं हँडल अन्… पाहा व्यक्तीचा जुगाड
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी पहिला आणि त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून रिपोस्ट करीत लिहिले की,”याच्यापेक्षा धोकादायक काय असू शकते. पालकांनो, कृपया तुमच्या मुलांची काळजी घ्या. कारण – हे जीव अनमोल आहेत” ; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.
आयपीएस अधिकारी पंकज नैन यांच्या अधिकृत @ipspankajnain या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुकल्यांबद्दल चिंता व्यक्त करताना तर चिमुकल्यांच्या पालकांनी सतर्क राहायला हवं याचे महत्त्व अधोरेखित करताना कमेंटमध्ये व्यक्त होताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.