सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कारण सध्याच्या डिजीटल जमान्यातील अनेक लोक इतके हूशार असतात की, त्यांना कोणती गोष्ट नेटकऱ्यांना आवडेल याची पुरेपुर माहिती असते. शिवाय इंटरनेटवर कधी कधी अशा आश्चर्यकारक गोष्टी व्हायरल होतात की, त्या पाहिल्यानंतर अनेकांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. तर कधी कधी अशा मजेशीर गोष्टी व्हायरल होतात ज्या पाहिल्यानंतर आपणाला हसू आवरता येत नाही.
सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन पोलीस एका गुन्हेगाराबरोबर बाकावर बसले आहेत. जे दृश्य अतिशय मजेदार आणि तितकेच धक्कादायक आहे. व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की, एक गुन्हेगार दोन पोलिसांच्या मधोमध बसला आहे. गुन्हेगाराच्या शेजारी बसलेले दोन्ही पोलीस आपापले मोबाईल पाहण्यात व्यस्त असल्याचंही दिसत आहे. शिवाय त्यांनी आपली बंदूकदेखील वरती ठेवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगाराचा एक हात मोकळा असल्याचं दिसत असून त्याच्या दुसऱ्या हातात हातकड्या बांधल्या आहेत. त्याच्या हाताला बांधलेली साखळी पोलिसांने धरायची म्हणून धरल्याचंही पाहायला मिळत आहे.
मजेशीर बाब म्हणजे गुन्हेगार पोलिसाच्या मोबाईलमध्ये डोकावताना दिसत आहे. त्यामुळे पोलिस आणि गुन्हेगार एकत्र काय पाहत आहेत? असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे. शिवाय अनेकजण हा फोटो पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. तर सध्या या दोन पोलिस आणि गुन्हेगाराचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो आयपीएस आरके विज नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. फोटो पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “दक्षतेचा अभाव” दरम्यान, हा फोटो नेटकऱ्यांचे चांगलच मनोरंजन करत आहे. अनेक नेटकऱ्यांनी फोटो खाली अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला आहे, तर अनेकजण यावर वेगवेगळे मीम्स बनवत आहेत