सध्याची तरुणाई सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीही करायला तयार असते. यासाठी ते अनेकदा विचित्र आणि जीवघेणे स्टंट करतात. शिवाय काहीजण तर अनेक चित्रपट पाहून काही सीन करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यामध्ये ते कधी हातात बंदुक घेतात तर कधी मद्यपान किंवा सिगारेट ओढतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय अनेक फॉलोवर्स त्यांना असं करण्यास प्रोत्साहित करतात. ज्यामुळे ते जास्तच फोटो व्हिडीओ शेअर करत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पण सध्या अशा एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अशा स्टंटचे फोटो किंवा व्हिडीओ शूट करण्याआधी अनेकजण हजार वेळा विचार करतील यात शंका नाही. हो कारण आयपीएस अधिकारी राहुल प्रकाश यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हातात बंदूक धरुन दहशत माजवणाऱ्या तरुणाचे वाईट हाल झाल्याचं दिसून येत आहे.
एका तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये त्याच्या हातात बंदूक दिसत आहे. शिवाय त्याने अशा अनेक पोस्ट टाकल्या आहेत ज्यामध्ये त्याच्या हातात वेगवेगळ्या बंदूक दिसत आहेत. तर त्याने असे फोटो लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने टाकले असावे असंही म्हटलं जात आहे. कारण फोटो पोस्ट करताना त्याने पुष्पा चित्रपटातील ‘पुष्पा राज में झुकेगा नही साला’ हा डायलॉगही लिहिला आहे.
हेही पाहा- जेट एअरवेजचे CEO भारतातील मेट्रो स्टेशनला म्हणाले ‘कलाहीन’; नेटकरी संतापले, म्हणाले “दुबईतच…”
त्याचे हे फोटो व्हायरल झाले आणि ते पोलिसांपर्यंत पोहचले. त्यानंतर त्याचे काय हाल झाले ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेलच. कारण हातात बंदूक घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला साधे आपल्या पायांवर उभंही राहायला येत नसल्याचं दिसत आहे. व्हिडीओत, तरुणाच्या पायाला पट्टी बांधल्याचं दिसत आहे आणि एक पोलिस त्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जात आहे. व्हिडिओ शेअर करताना राहुल प्रकाश यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘कायद्याचे हात फक्त लांबच नसतात….. त्यामुळे त्यांना कॅप्शनमधून हेच सांगायचं आहे की, अशा लोकांना सरळ करण्यासाठी कधी कधी पोलिसांना धाडसी पाऊलही उचलावं लागतं. IPS राहुल प्रकाश हे सध्या CID (CB) मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून तैनात आहेत.
नेटकऱ्यांनी केलं पोलिसांचं कौतुक –
हेही पाहा- जबरदस्त! ChatGPT ला विचारला प्रश्न अन् तरुणाचं नशीबच पालटलं; झाला लखपती, कसं ते जाणून घ्या
आयपीएस अधिकाऱ्याच्या या ट्विटवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, पुष्पा झुकेगा और ठुकेगा भी, तर आणखा एकाने लिहिलं आहे, “सहमत आहे, पण मला सांगा की प्रत्येक वेळी पाय, गुडघ्यावर किंवा गुडघ्याच्या खाली पोलिस इतके अचूक कसे गोळी कशी मारतात? ही गोळी किती लांबून मारली आहे? कमेंट करताना दुसर्या एका यूजरने लिहिले की, आजची पिढी कोणत्या दिशेने चालली आहे हे समजत नाही, सोशल मीडियावर या लोकांना फॉलो करणाऱ्यांवरच लाठीचार्च करायला पाहिजे. शिवाय आयपीएस अधिकाऱ्याचं अनेकांनी यूजर्सनी कौतुकही केले आहे.