Iran-Israel Conflict Fact Check video: इराण आणि इस्रायल संघर्षाविषयी सध्या जगभरातील देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण हा संघर्ष जरी दोन देशांमधील असला तरी त्याचा परिणाम व्यावहारिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून असलेल्या देशांनाही भोगावा लागणार आहे, त्यामुळे सर्वच देश आता हे युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. मात्र, सोशल मीडियावर इराण आणि इस्रायल संघर्षाविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार होत असल्याचे दिसत आहे. यात लाइटहाऊस जर्नलिझमला असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले, जो इस्रायलमधील असल्याचा दावा केला गेला. या व्हिडीओमध्ये इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात गॅस स्टेशनवर मोठा भीषण स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, खरंच व्हिडीओत दावा केल्याप्रमाणे इराणने इस्रायलमधील गॅस स्टेशनवर हल्ला केला का; याबाबतचे सत्य आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक वेगळी महिती समोर आली, ती काय होती जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

X युजर InShort ने त्याच्या प्रोफाईलवर दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन इथे पाहा.

https://web.archive.org/web/20241004071938/https://twitter.com/InshortStories/status/1841221043479805958

इतर युजर्सदेखील तोच दावा करत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओवरून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला एका महिन्यापूर्वी YouTube वर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला. या व्हिडीओचे शीर्षक होते: एडन, येमेन| गॅस स्टेशनवर भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

आम्हाला हाच व्हिडीओ दुसऱ्या एका YouTube चॅनेलवरदेखील सापडला.

यावरूनही हा व्हिडीओ येमेनच्या एडन शहरातील असल्याचे समजते.

त्यानंतर आम्ही उपलब्ध माहितीवर Google कीवर्ड सर्च केले, त्यावेळी घटनेबद्दल एक बातमी आढळली.

https://www.aa.com.tr/en/middle-east/explosion-at-gas-station-in-southern-yemen-causes-multiple-casualties/3317482

गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या या बातमीत म्हटले आहे की, स्थानिक सु्त्रांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण येमेनच्या एडन गव्हर्नोरेटमधील गॅस स्टेशनवर भीषण स्फोट झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले, तसेच अनेक जण मृत्युमुखी पडले. गॅस स्टेशनला आग लागल्यानंतर मनसौरा जिल्ह्यातील अल-तासीन स्ट्रीटवरही स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज शहरातील विविध भागांत ऐकू आला.

आम्हाला ऑनमनोरमा पोर्टलच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेली फेसबुक रीलदेखील सापडली.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे : येमेनच्या एडन शहराच्या उत्तरेकडील मनसौरा जिल्ह्यात गॅस स्टेशनवर झालेल्या स्फोटानंतर तिथे सर्वदूर आग पसरली. स्रोत: एएफपी

आम्हाला फ्री प्रेस जर्नलच्या YouTube चॅनेलवरही एक व्हिडीओ सापडला.

निष्कर्ष : येमेनमधील एडन शहरात गॅस स्टेशनवर झालेल्या स्फोटाचा जुना व्हिडीओ आता इराण-इस्रायल संघर्षादरम्यानचा असल्याचा दावा करत सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल होणारा दावा दिशाभूल करणारा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran israel conflict fact check video iran israel conflict fact check video old video of yemen gas station explosion goes viral as recent from iran and israel war sjr