इराणच्या न्यायालयाने एका जोडप्याला १० वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या जोडप्याने इराणची राजधानी तेहरानमधील फ्रीडम स्क्वेअरमध्ये स्ट्रीट डान्स करतानाचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर इस्लामिक सरकारने नाराजी व्यक्त करताना या जोडप्याला अटक केली. या ब्लॉगर जोडप्याचे नाव अस्तियाज हगिघी आणि अमीर मोहम्मद अहमदी असे आहे. इराण मीडियाच्या वृत्तानुसार, २९ जानेवारी रोजी रिवोल्यूशनरी कोर्टने या जोडप्याला १० वर्षे ६ महिन्यांची शिक्षा सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इराण कोर्टाने या जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी नाचणे आणि वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन दिल्याबद्दल दोषी मानले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॉगर अस्तियाज हागीगी आणि अमीर मोहम्मद अहमदी यांनी इराणच्या आंदोलकांचे समर्थन करणारा एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर त्यांना नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेहरानमधील आझादी स्क्वेअरवर ब्लॉगर जोडप्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

येथे पाहा व्हिडीओ

( हे ही वाचा: भारतातील ‘या’ रहस्यमय दरीत गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क)

डान्स केल्यामुळे सुनावली शिक्षा

यानंतर सरकारने दोघांच्या ऑनलाइन कंटेंट पोस्ट करण्यावर देखील बंदी घातली आहे. रिवोल्यूशनरी कोर्टने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणण्याचा आणि सरकारच्या विरोधात अपप्रचार केल्याचा आरोपही दोन्ही जोडप्यांवर केला आहे. खरं तर इराणमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी नाचण्याची परवानगी नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, अटक केल्यानंतर दोघांनाही मारहाण करण्यात आली आणि त्यांना मिनिस्ट्री ऑफ इंटेलिजेंसच्या वॉर्ड २०९ मध्ये हलवण्यात आले. इराण सरकारवर असेही आरोप आहेत की त्यांनी अस्तियाज आणि अमीर यांना वकील ठेवू दिले नाहीत, त्यांना जामीनही दिला नाही. यासोबतच त्यांनी अटकेबाबत कोणाशीही बोलू नये यासाठी सरकारकडून दोघांच्या कुटुंबीयांवर सतत दबाव टाकला जात आहे.