Rail Guard Viral Video : सोशल मीडियावर भारतीय रेल्वेसंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कोणी दोरीने ट्रेनमध्ये बर्थमध्ये सीट बनवतोय तर कोणी बाथरुममध्ये बसून घरी जातय. दरम्यान, भारतीय रेल्वेतील अशीच एक घटना समोर आली आहे, जी जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल; तसेच तुम्ही रेल्वे गार्डचे कौतुक कराल. ही घटना इटारसी जंक्शनवर घडली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, अशी काय घटना घडली? रेल्वे गार्डने नेमकं कोणतं कौतुकास्पद काम केलं? हे जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इटारसी जंक्शनवरील या व्हिडीओमध्ये एक जोडपं चालत्या ट्रेनसमोर असहाय आणि चिंतेत उभे असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात घडले असे की, हे जोडपं काही सामान घेण्यासाठी गाडीतून खाली उतरलं होतं आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा गाडी सुरू झाल्याचे दिसले. हे पाहून जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली, त्यांनी आरडाओरडा सुरू केला. कारण त्यांची दोन्ही मुलं चालत्या ट्रेनमध्ये होती, यामुळे पालकांची अवस्था बिकट झाली होती. (Rail Viral Video)

पण, यावेळी जेव्हा कोणीतरी ट्रेनच्या शेवटच्या डब्यात उपस्थित असलेल्या रेल्वे गार्डला ओरडून ही गोष्ट सांगितली तेव्हा गार्डने प्रसंगावधान दाखवत साखळी ओढली आणि ट्रेन थांबवली. यानंतर या जोडप्याने ट्रेनमध्ये चढण्यासाठी धाव घेतली. रेल्वे गार्डने केलेल्या या मदतीचे आता लोक टाळ्या वाजवून कौतुक करत आहेत.

“पालकांनी यातून धडा घेतला असेल” युजर्सच्या कमेंट्स

बापरे! भल्यामोठ्या फणाधारी किंग कोब्राचे तरुणाने घेतले चुंबन, तितक्यात घडले असे काही की…; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

रेल्वे गार्डने केलेल्या या मदतीमुळे अनेक युजर्स कमेंट्समध्येही कौतुक करत आहेत. एकाने लिहिले की, ‘रेलगार्ड जी गुड जॉब.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘पालकांना अजिबात काही काळजी वाटत नाही.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘मला आशा आहे की, पालकांनी यातून धडा घेतला असेल.’ अनेक युजर्सचे असेही म्हणणे आहे की, हे पालक आपल्या मुलांना सोडण्याचा विचार करत होते. यावर एका युजरने लिहिले की, ‘ट्रेन स्लो होती, पालक हवे असते तर चढू शकले असते.’