Indian Railways Helpline Number : भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी असे म्हटले जाते. या रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे देशभर पसरलेले आहे. भारतीय रेल्वेतून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. अनेकवेळा प्रवाशांना ट्रेनमधून प्रवास करताना समस्यांना सामोरे जावे लागते. प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वेने अनेक व्यवस्था केल्या आहेत. यापैकी एक भारतीय रेल्वे हेल्पलाइन क्रमांक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यासाठी रेल्वेने विशेष हेल्पलाइन क्रमांकांची व्यवस्था केली आहे. तुम्ही या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून सुरक्षेशी संबंधित समस्यांबद्दल तक्रार करू शकता.

त्याचबरोबर ट्रेनमध्ये पंखा किंवा वीज काम करत नाही, चार्जिंग पॉइंट खराब झाल्याची माहिती तुम्ही हेल्पलाइन नंबरवर देऊ शकता. याशिवाय या हेल्पलाइन नंबरवर कॉल करूनही तुम्ही आजारी पडल्यास मदत मागू शकता. अशाच काही रेल्वेच्या हेल्पलाईन नंबरबद्दल जाणून घेऊया जे तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले पाहिजेत.

तत्काळ तिकीट बुकिंगचं टेन्शन सोडा! कन्फर्म सीट मिळवण्यासाठी करा फक्त ‘हे’ एक काम

१) 139 / 182

भारतीय रेल्वेच्या या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुम्ही कोणत्याही समस्येची तक्रार करू शकता. रेल्वेच्या या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुम्ही १२ भाषांमध्ये तुमची तक्रार नोंदवू शकता.

या नंबरवर, वीज आणि पाण्याशी संबंधित समस्यांसह आपण कोणत्याही अज्ञात व्यक्तीने ट्रेनमध्ये प्रवेश केल्यास किंवा चोरीची तक्रार करू शकता. याशिवाय ट्रेनमधून प्रवास करताना ताप आल्यास किंवा कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीची गरज भासल्यास या क्रमांकावर कॉल करून मदत मागू शकता.

२) 1323

ट्रेनमधून प्रवास करताना भूक लागल्यास, आयआरसीटीसी नंबर 1323 डायल करून तुम्ही तुमचे आवडते पदार्थ ऑर्डर करू शकता. ही सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत उपलब्ध असते वा

३) 7208073768/9904411439

ट्रेनमधून प्रवास करताना, जर तुमच्या डब्यात स्वच्छता योग्य प्रकारे केली गेली नसेल किंवा लाइट व्यवस्था योग्य नसेल. याशिवाय एसी खराब असेल आणि उशा आणि बेडशीट अस्वच्छ असतील तर तुम्ही या रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 7208073768/9904411439 वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc indian railways helpline numbers facing difficulties during travel register your complaint on these railway helpline numbers sjr
Show comments