Indian Railway Ticket Booking System Video : प्रवाशांना तिकिटासाठी रेल्वे स्टेशनवर तासंतास रांगेत उभे लागते. पण तिकीट काउंटरवर व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीप्रमाणे जर कर्मचारी असतील तर अनेकांना तिकिटासाठी तासंतास रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. यामुळे रेल्वे तिकीटासाठी लागलेली रांग काही मिनिटातच संपेल. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती वेगाने तिकीट बुक करताना दिसत आहे, त्या व्यक्तीच्या हाताचा वेग पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक मध्यमवयीन व्यक्ती ऑटोमॅटिक तिकीट वेडिंग मशीन (एटीव्हीएम) अतिशय वेगाने चालवत असल्याचे दिसत आहे. या मशीनच्या स्क्रीनवर त्याच्या हातांची बोट विजेच्या वेगाने फिरताना दिसतायत. डोळ्याची पापणी मिचकत नाही तोवर ३ सेकंदात तो तिकीट बुक करुन प्रवाशाच्या हातात देतो. यानंतर पुढच्या प्रवाशाला पुढे यायला सांगतो. यासाठी नेक्स्ट म्हणून आवाज देतो. तिकीट देणाऱ्या व्यक्तीचे कौशल्याने कोणाचे तरी मन जिंकले आणि त्यानंतर त्या व्यक्तीने हा व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे.
इन्स्टाग्रामवर anbukowsi123′ नावाच्या एका यूजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याला कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘तमिळनाडूचे सर्वात वेगवान ट्रेन बुकिंग काउंटर’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्याला आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने पांढऱ्या-निळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातली आहे. तो प्रवाशाला वेगाने तिकीट बुक करून देत आहे.
या व्यक्तीचा व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाला होता. @MumbaiRailUsers नावाच्या ट्विटर अकाउंटवरून २९ जून २०२२ रोजी तो पोस्ट केले गेला होता. जो अजूनही त्याच्या खात्यावर पिन केलेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शन लिहिले आहे की, ‘कुठेतरी भारतीय रेल्वे १५ सेकंदात तीन प्रवाशांना तिकीट देत आहे, इतकी वेगवान आहे.’