Indian Railways Viral Video : काही दिवसांपासून लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. असे बेपर्वा प्रवासी कोणत्याही कारवाईला न घाबरता, अगदी बिनधास्तपणे ट्रेनमध्ये चढतात. इतकेच नव्हे, तर ते आरक्षित सीट्सवरदेखील आपला अधिकार सांगू लागतात. अशा परिस्थितीत आरक्षित तिकीटधारक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशाच प्रकारे एका ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवासी महिलेने बळजबरीने आरक्षित आसनावर ताबा मिळविला. इतकेच नव्हे, तर त्या आरक्षित तिकीटधारकालाही त्याची सीट देण्यास नकार देत, ती दादागिरीची भाषा करू लागली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक विनातिकीट प्रवासी महिला आरक्षित सीटवर बसून इतर प्रवाशांशी वाद घालतेय. सुरुवातीलाच ती महिला ही सीट माझी नसल्याचे कबूल करते. त्यानंतर ती सीट ज्याने बुक केली तो प्रवासी तिला सीट रिकामी करण्यास सांगतो; पण तसे न करता, ती दुरुत्तरे करीत त्या प्रवाशालाच “तुम्ही, टीटीईला कॉल करा. तो आल्यावर बोलू“, असे खूप उर्मटपणे सांगते.

हेही वाचा – पीएफ खात्यातून तुम्ही एका वेळी किती पैसे काढू शकता?

त्यावर त्या उद्धट महिलेचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा संबंधित प्रवासी तिला सीट रिकामी करून देण्यास टीटीईची वाट बघत सांगतो; पण ती कोणाचेही ऐकत नाही आणि तशीच सीटवर बसून राहते. त्यावेळी इतर सीट्सवरील प्रवासीही तिला सीट खाली करण्यास सांगतात; पण त्यांनाही ती अतिशय अवमानकारक बोलून गप्प करते. यावेळी ती एका महिला प्रवाशाला म्हणतेय, “ए तू गप्प राहा. तुझ्या सीटवर बसलीय का? तुला अशी वाईट शिव्या घालेन ना…”, महिलेचे हे बोलणे पाहून प्रवासी संतापतात आणि तिला पुन्हा दोष देऊन बोलू लागतात.

दरम्यान, तो प्रवासी वारंवार तिला उठण्यास सांगतो. त्यावर ती महिला, “मी कोणाचं ऐकणार नाही. मी बसली आहे आणि मी इथेच बसणार आहे. तुम्ही बोलत राहा. तक्रार करा. मला पर्वा नाही“, अशा दादागिरीच्या भाषेत ती अद्वातद्वा बोलू लागते. तसेच ती आपण रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगत टीटीई येईपर्यंत इथून उठणार नाही, असे सांगू लागते.

पाहा व्हायरल व्हिडीओ

शोनी कपूर नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे; जो आता खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, ही घटना व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या महिलेवर कारवाईची मागणी केली आहे.

एका युजरने महिलेच्या अशा अतिशय वाईट वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. त्यावर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, मी पैज लावतो की, तिने असे पहिल्यांदा केले नाही. आणखी एक युजरने लिहिले की, आजकाल रिझर्व्ह सीट्स विनोदाचा भाग बनल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc news woman traveling without ticket forcefully occupied reserved seat argues with passengers indian railways reacts sjr