Indian Railway Seat struggle saga: ट्रेनमधून लांब पल्ल्याचा प्रवास करताना खूप गर्दी असेल, तर अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात काही वेळा रिझर्व्ह सीट असतानाही प्रवाशांना बसण्यासाठी जागा दिली जात नाही. इतर अनारक्षित तिकिटावर प्रवास करणारे प्रवासी दमदाटी करून किंवा भांडून रिझर्व्ह सीट हडप करतात. अशा वेळी रिझर्व्ह तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. १८ फेब्रुवारी रोजी YNRK-HWH एक्स्प्रेसने (Yog Nagari Rishikesh HOWRAH JN SPECIAL) प्रवास करणाऱ्या एका महिलेला अशाच प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागला. त्यानंतर तिने तिच्या भावाच्या मदतीने ट्विटरद्वारे रेल्वे प्रशासनाकडून मदत मागितली; जी मदत तिला काही मिनिटांत मिळाली. दरम्यान, या घटनेसंबंधित एक पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in