लग्न हा एक सांस्कृतिक सोहळा असतो जिथे विविध परंपरा आणि विधी पाहायला मिळतात. जेव्हा दोन वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या व्यक्तीचे जेव्हा लग्न होते तेव्हा एकमेकांच्या संस्कृतीबाबत माहिती होते. सोशल मीडियाव अशाच एका लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर आयरीश महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कॅरी बॉयड-शाह या आयरिश महिलेने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. एका भारतीय लग्नात डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने सांगितले की,”तिने तिच्या बंगाली भाच्याच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात तिचा डान्स परफॉर्मन्स केला आहे.”

ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Director Laxman Utekar clarification after meeting Raj Thackeray regarding the film Chhawa Mumbai news
‘छावा’मधील लेझीम नृत्याच्या प्रसंगाला कात्री; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे स्पष्टीकरण
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?
2 women marry each other
नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
Zapuk zupuk dance
‘मारवाडी लग्नात वाजलं ‘झापुकझुपूक’ गाणं…’ जबरदस्त डान्स होतोय तुफान व्हायरल; पाहा VIDEO
yelkot yelkot jaiyelkot yelkot jai malhar song vaghya murali dance malhar
“मल्हारी मार्तंड शिव मल्हार!” वाघ्या-मुरळीच्या रुपात सादर केले जबरदस्त नृत्य; Viral Video पाहून प्रत्येक मराठी व्यक्तीच्या अंगावर येईल काटा
“लल्लाटी भंडार…!” भररस्त्यात तरुणांनी केला देवीचा जागर; जोगवा नृत्य पाहून अंगावर येईल काटा, पाहा Viral Video

“आज मी नेहमीपेक्षा थोडे वेगळे शेअर करणार आहे आहे, या आठवड्यात माझ्याकडून कोणतीही घरगुती कॉन्टेट दाखवणार नाही कारण आम्ही आमच्या पुतण्याचे लग्न साजरे करत आहोत. मी त्याच्या मेहंदी पार्टीत माझ्या भाचींसह डान्स केला,” असे बॉयड-शाहने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले. तिच्या पोस्टवरील कमेंटला उत्तर देताना तिने हे देखील सांगितले की तिचे लग्न बंगाली कुटुंबात झाले आहे.

हेही वाचा – “निस्वार्थ प्रेम! आईला पुन्हा भेटून आनंदाने उड्या मारू लागला कुत्रा, पाहा गोंडस Video

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, आयरीश महिलेने पारंपारिक दागिन्यांसह सुंदर साडी नेसली आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे ती सुंदर डान्स करताना दिसत आहे.पोस्ट केल्यापासून, व्हिडिओला ७.३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या शेअरला जवळपास १२,००० लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ शेअर करताना लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या.

हेही वाचा – “कंडक्टर नव्हे, देसी स्पायडरमॅन!” धावत्या बसमधून खाली पडणार होता तरुण, तेवढ्यात…. थरारक घटनेचा Video Viral

एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही केटी पेरीसारखे दिसता”. हीच भावना इतर अनेकांनी व्यक्त केली.

“अरे, किती सुंदर. तू विलक्षण दिसत आहेस,” दुसऱ्याने जोडले.

“मला आश्चर्य वाटले की तुम्हाला नृत्य आठवते! तू अविश्वसनीय दिसत आहेस, कॅरी!” तिसरा म्हणाला.

“कॅरी, तू परिपूर्ण सुपरस्टार!! तू खूप अप्रतिम दिसत आहेस,” चौथ्याने कौतुक केले.

कॅरी बॉयड-शाह तिच्या इंस्टाग्राम पेजवर DIY होम डेकोरच्या कल्पनांबद्दल पोस्ट शेअर करते. काही वेळाने, ती तिच्या सुंदर कुटुंबाची – तिचा नवरा आणि दोन मुलींची झलक देखील देते.

Story img Loader