करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. IPL च्या यंदाच्या हंगामाबाबतही फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र सध्या IPL मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जोफ्रा आर्चरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
“मोदीजी, तुमचा व्हिडीओ दाखवा… घंटा वाजवलीत की टाळ्या?”
इंग्लंडच्या संघात दोन वर्षांपूर्वी पदार्पण करणाऱ्या जोफ्रा आर्चरने आपल्या कामगिरीच्या जोरावर साऱ्यांची वाहवा मिळवली. २०१९ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीमुळे मातबर फलंदाजांना सळो की पळो केलं. त्याने ११ सामन्यांत ८ गडी टिपले आणि दडपणाखाली उत्तम कामगिरी केली. Ashes मालिकेतही त्यानं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची तारांबळ उडवली.
निर्भया दोषींच्या फाशीआधी जल्लाद म्हणाला… “आधी फासावर लटकवतो, मग खाण्यापिण्याचं बघू”
सध्या जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त आहे. तो विश्रांती घेत आहे. तसेच साऱ्या क्रीडास्पर्धाही रद्द झाल्या आहेत. मात्र तरीही एका वेगळ्याच कारणासाठी तो चर्चेत आहे. ते कारण म्हणजे त्याने सहा वर्षांपूर्वी केलेलं ट्विट… मैदानासह जोफ्रा आर्चरची सोशल मीडियावरील कामगिरीही नेहमी चर्चेत राहिली आहे. त्यानं केलेले ट्विट ही भविष्यवाणीच असते, असे अनेकवेळा चाहते दाखवून देत असतात. अनेकदा तसे योगायोग जुळूनही आले आहेत. असाच योगायोग पुन्हा जुळून आला आहे.
कल्याण : अतिउत्साह नडला… क्रिकेट खेळणाऱ्या आठ जणांना अटक
सध्या सारे जण करोनाशी दोन हात करण्यासाठी आपापल्या घरी थांबणे पसंत करत आहेत. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या त्या ट्विटटचा संबंध सध्याच्या करोना व्हायरसशी जोडला आहे. “एक दिवस असा येईल जेव्हा कुठेही पळून जाण्याचा मार्ग शिल्लक राहणार नाही”, असे ट्विट त्याने केले होते.
CoronaVirus : “जिवंत राहिलो तर ऑलिम्पिक खेळणार ना…”
हे ट्विट त्याने २०१४ साली केले होते. मात्र लोकांनी त्याचा संबंध सद्यस्थितीशी लावला. त्यामुळे जोफ्रा आर्चरने खरंच भविष्यवाणी केली होती का? या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.