अंडी करी असो किंवा ऑम्लेट, रोटी पराठा सोबत खाताना त्याची सालही तोंडात आली तर जेवणाची चव आणि मजा दोन्ही बिघडते. हे अनेकदा अंड्याचे कवच योग्य प्रकारे न काढल्यामुळे होते. अनेक वेळा उकडलेले अंडे सोलताना त्यांचा पांढरा भागही बाहेर येऊ लागतो. किंवा अंड्याचे कवच काढताना त्याची साल अंड्यावरच अडकून राहते. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर ही आयडिया तुमच्या नक्कीच उपयोगाची ठरेल. उकडलेले अंडे सोलण्याची ही अनोखी आयडिया दाखवणारा एक व्हायरल व्हिडीओ सध्या लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत.

उकडलेले अंडी सोलणं हे काही कठीण काम नाही, पण केवळ तोडांने फुंकर मारून अंडी सोलणं याला मात्र टॅलेंट लागतं. हे टॅलेंट दाखवत एका तरूणाने काही सेकंदात उकडलेले अंडी सोलून दाखवलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. व्हिडीओच्या सुरूवातीला तो अंड्याच्या खालच्या बाजूला एक मोठा छिद्र करतो आणि दुसऱ्या बाजूला एक लहान छिद्र करतो, नंतर तो त्याच्या तोंडाने त्या छोट्या छिद्रात फुंकर मारतो आणि उकडलेले अंडे कवचातून बाहेर येतं. हे पाहून तुम्ही आश्चर्य व्हाल. पण ही अनोखी आयडिया तुमच्या नक्कीच उपयोगाची ठरणार आहे.

Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या

आणखी वाचा : डोळ्यात अश्रू… हातात दिवंगत वडिलांचा फोटो घेऊन नवरी मंडपात आली, पाहा भावूक VIRAL VIDEO

हा व्हिडीओ कंटेट क्रिएटर मॅक्स क्लायमेन्कोने बनवलेला असून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मॅक्सने हा व्हिडीओ ८ फेब्रुवारी रोजी शेअर केला असला तरी, तो इतका व्हायरल झाला की यूट्यूबने काल त्यांच्या अधिकृत Instagram पेजवर तो पुन्हा पोस्ट केला. यूट्यूबने पुन्हा पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “बीआरबी, आज रात्री अंडी उकळणार आहे, फक्त हे करण्यासाठी.”

आणखी वाचा : ‘व्हेन पॉप्स इज द बॉस’! पायलट बाप-लेकाची जोडी एकत्र उड्डाण करतानाचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : विदेशी तरूणाने चक्क स्केटिंग करत वेगात धावणारी बस पकडली, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भऱभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकाने कमेंट केली की, “मी नेहमी अंडी खूप सोलतो आणि माझ्याकडे कोंबडी आहे, मी जाऊन हे करून पाहणार आहे.” एका व्यक्तीने आपल्या कमेंटमध्ये स्वच्छतेच्या अभावाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि लिहिले, “मग तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना असंच फुंकर मारत अंडी सोलून सर्व्ह करता का?”

Story img Loader