Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी लहान मुलांचे व्हिडीओ, तर कधी वृद्धांचे व्हिडीओ, कधी डान्स व्हिडीओ तर कधी जुगाडचे व्हिडीओ चर्चेत येतात. काही लोक भयानक स्टंट करताना दिसतात तर काही लोक आजुबाजूला घडणाऱ्या घटना व्हिडीओत कैद करून शेअर करतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो.
सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आज्जीबाई ऑक्सिजन मास्क बाजूला करून हॉस्पिटलच्या बेडवर सिगारेट ओढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही कोणालाही धक्का बसेल.
जीवापेक्षा व्यसन महत्त्वाचं? आज्जीबाईने ऑक्सिजन मास्क काढला अन् ओढली सिगारेट
जेव्हा माणूस आजारी पडतो, तेव्हा त्याला काही सुचत नाही. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर बेडवर आराम करावा लागतो पण या व्हिडीओमध्ये तुम्हाला विचित्र दृश्य दिसेल. एक आज्जीबाई हॉस्पिटलमध्ये बेडवर बसून चक्क सिगारेट ओढताना दिसत आहे. तिच्या नाकाला लावलेला ऑक्सिजन मास्क बाजूला करून ती सिगारेट ओढते. आज्जीला सिगारेट ओढताना पाहून एक महिला तिच्या हातातील सिगारेट हिसकावून घेते. हा व्हिडीओ होळीचा आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की आज्जी आणि आज्जीच्या शेजारी बसलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर रंग लावलेला आहे.
मरणाच्या दारात उभ्या असलेल्या या आज्जीला जीवापेक्षा सिगारेट महत्त्वाची वाटतेय, अशा आशयाचे अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
@alfaaj_adhure या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असे लोक स्वत: मारतात” तर एका युजरने लिहिलेय, “हे देवा, परमेश्वरा” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा मुर्खपणा आहे, असे चुकूनही करून नये” एक युजर लिहितो, “एवढा आत्मविश्वास येतो कुठून?” तर एक युजर लिहितो, “आयुष्य एकदाच मिळतं, त्याची किंमत करायला शिका” सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी सुद्धा सोशल मीडिया असे अनेक विचित्र व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.