टांझानियाचा इन्फ्लुएन्सर किली पॉल आपल्या लिपसिंकच्या व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे. एका लहानश्या खेड्यात राहणारा किली आता सोशल मीडियाचा स्टार बनला आहे. बॉलिवूडच्या गाण्यांवर लिपसिंक करून किली अनेक व्हिडीओ तयार करत असतो. यामुळेच भारतातही त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. नुकताच किलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ त्याच्या इतर अनेक व्हिडीओपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
या व्हिडीओमध्ये किली आपल्या पारंपारिक पोशाखात दिसत आहे. मात्र यावेळी कोणत्याही गाण्याचे लिपसिंक करण्याऐवजी त्याने स्वतः गाणे गायले आहे. त्याने शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातील ‘तुझ में रब दिखता हैं’ हे गाणे गायले. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून सध्या यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
जीव वाचवण्यासाठी तब्बल सहा तास फ्रिजमध्ये बसून राहिला अन्…; पाहा नेमकं काय घडलं
किली या हिंदी गाण्यातील शब्दांचा अचूक उच्चार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे. किलीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फारच आवडला असून आतापर्यंत या व्हिडीओला अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहे. तर १.६ मिलिअनहून अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.
काही दिवसांपूर्वीच कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या लोकप्रिय शोमध्ये किली पॉलने हजेरी लावली होती. यावेळी त्याने माधुरी दीक्षितसह ‘चने के खेत में’ या हिंदी गाण्यावर ठेकाही धरला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ माधुरी दीक्षितच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये किली पॉल आणि माधुरी दीक्षित गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत.