‘जाने तू… या जाने ना’ या सिनेमाचा अभिनेता इम्रान खानच्या प्रेमात त्यावेळी कोणी पडलं नसेल असं झालं नाही. गोड, निरागस, गुडबॉय अशी प्रतिमा असलेल्या जय या पत्राने सर्वांची मन जिंकले. आय हेट लव स्टोरीज, दिल्ली बेली, मेरे ब्रदर की दुल्हर, आणि एक मैं और एक तू यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारली.
पण गोरी तेरे प्यार में आणि कट्टी बत्तीच्या अपयशानंतर अभिनेत्याने काम करण बंद केलं. काही वर्षांनंतर, अभिनेत्याने पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळे होण्याची घोषणा केली. तेव्हा एकदा तो पुन्हा चर्चेत आला होता. आता आमिर खानची मुलगी इरा हिने ईदच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले तेव्हा त्यात इम्रान दिसला. या फोटोमध्ये इम्रानला ओळखता येत नाहीये. फोटोसोबत इराने पोस्टला कॅप्शन दिले आहे की, “तुम्ही लग्न होईपर्यंत ईदीसाठी पात्र आहात हे तुम्हाला माहीत आहे का?! मला वाटले की तुम्ही प्रौढ (१८) झालात की झालं. तुम्ही रोज काही तरी शिकत असता. ईद मुबारक”
(हे ही वाचा: वडिलांनी लग्नासाठी पाठवलेल्या मुलाला मुलीने दिली ‘ही’ खास ऑफर; चॅटची होतेय सर्वत्र चर्चा)
काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी २०११ मध्ये आमिर खानच्या पाली हिलच्या घरी लग्नगाठ बांधली. दोघांनी २०१४ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचं स्वागत केले आणि तिचे नाव ठेवले इमारा. २०१९ मध्ये, या दोघांनी जाहीर केले की ते वेगळे झाले आहेत आणि अवंतिकाने त्यांच्या मुलीसह खानचे घर सोडले. काही महिन्यांपूर्वी, इम्रान आपल्या मुलीसह समुद्रकिनाऱ्यावर दिसला होता आणि चाहत्यांना तेव्हाही हा इम्रानच आहे यावर विश्वास बसत न्हवता.
(हे ही वाचा: ‘सामी-सामी’ गाण्यावर आजीने केला जबरदस्त डान्स! व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
इम्रान बॉलीवूडपासून दूर झाला असला तरी त्याचे चाहते अजूनही तो पुन्हा एकदा मोठ्या पद्यावर झळकेल अशी आशा करत आहेत.